०९ एप्रिल रोजी मुंबईत प.पू.सद्गुरूस्वामी बाळ सत्यधारी महाराज यांचा व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनवर प्रबोधन मेळावा !
[ ठाणे -उदय दणदणे ]
प.पू. सद्गुरूस्वामी बाळ सत्यधारी महाराज यांच्या आध्यात्मिक सेवा केंद्रातून सामाजिक सेवा जसे अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, बजावत असताना लाखों लोकांना व्यसनमुक्ती करून अनेक कुटुंबीय सुखी समाधानाचे जीवन जगत आहेत.
परमपूज्य सद्गुरूस्वामी बाळ सत्यधारी महाराज यांचे आध्यात्मिक व राष्ट्रीय कार्य गेली अनेक वर्षे जवळ जवळ अडीच तपाहुन अधिक काळ अविरत चालू आहे.
राष्ट्रीय महापुरुषांचे विचार व त्यांच्या कार्याचे प्रबोधन करून, समाजातील अनेक रंजलेल्या गांजलेल्या गोर गरीब जनतेला व कष्टकऱ्यांना व्यसनमुक्त व अंधश्रद्धा मुक्त करून त्यांच्या अंतकरणामध्ये मानाचे स्थान प्राप्त झालेले,अशा त्यांच्या थोर कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन शासनाच्या विविध विभागीय राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले, तसेच दया, क्षमा, शांती अशा सात्विक मार्गाने जनमानसात विश्वास देऊन त्यांना सक्षम बनवण्याचे कार्य प.पू. सद्गुरूस्वामी बाळ सत्यधारी महाराज यांचे हे सामाजिक सेवेचे व्रत गेली अनेक वर्षे अविरत चालू आहे.
असे हे महंत थोर विचारांचे प.पू. सद्गुरूस्वामी बाळ सत्यधारी महाराज यांचा व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलनवर राष्ट्रीय प्रबोधन मेळावा, शा. कु.पंतवालावलकर माध्यमिक विद्यालय, (नेहरूनगर) कुर्ला -पूर्व मुंबई-२४ येथे, रविवार दिनांक- ०९ एप्रिल २०२३ रोजी, सकाळी ०९ वा. आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्यात आरोग्य शिबिर, विद्यार्थी व मान्यवरांचे सत्कार, महाप्रसाद अश्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे.
सर्व भाविक भक्तगण तसेच समाजातील बंधू भगिनी, यांनी या बहुमूल्य असं प्रबोधन मेळावा कार्यक्रमाचा आवश्य लाभ घेऊन आपले जीवन सफल करा, महाराज सर्वजनांना सदोगतीचे मार्गदर्शन करतील असे आवाहन "प.पू.सद्गुरूस्वामी बाळ सत्यधारी महाराज मुंबई मंडळाचे अध्यक्ष-विलास घाणेकर, उपाध्यक्ष-सुभाष बांबरकर, सचिव-विनय पवार, संदेश वाहक- राजेंद्र जाधव, समस्त कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment