Friday, 7 April 2023

सोयगाव तालुक्यात विजांचे आकांड तांडव पाच जण जखमी-शेळी ठार रब्बीच्या पिकांची नुकसान !

सोयगाव तालुक्यात विजांचे आकांड तांडव पाच जण जखमी-शेळी ठार रब्बीच्या पिकांची नुकसान !

     सोयगाव तालुक्यात विजांच्या कडकडाट मध्ये गंभीर झालेला

जरंडी, ( सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर), ता.०७ - सोयगाव सह तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळीच्या पाऊस व विजांच्या आकांडतांडव झाल्या मुळे पाच जण वीज कोसळून जखमी झाले तर वेताळवाडी धरण परिसरात एका शेळीचा वीज पडून ठार झाली आहे. 

.                                       मृत शेळी

सोयगाव सह तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी व रात्री उशिरा अवकाळीच्या पाऊस व विजांच्या कडकडाट मध्ये सोयगाव जवळील वेताळवाडी धरण परिसरात शेळी चारत असताना बापू दिलीप सोनवणे (वय ३०) यांच्या शेळी वर वीज कोसळली यामध्ये शेळी ठार झाली असून बापू सोनवणे हे गंभीर रीत्या भाजून जखमी झाले आहे, दरम्यान सोयगाव तालुक्यातील वरखेडी (खु) येथे गट क्र- ७३ मध्ये शेतात असलेल्या सुरेश राठोड, गौरव राठोड, आश्विन राठोड व अमरसिंह जाधव हे चार जण वीज कोसळून गंभीर जखमी झाले असल्याची खळबळजनक घटना सीयगाव तालुक्यात घडली असून या चौघांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येऊन त्यांना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे दरम्यान सोयगाव चे वेताळवाडी धरण गलवाडा फर्दापूर, ठाणा वरखेडी (खु), वरखेडी (बु) या भागात अवकाळीच्या पावसाचा जोर अधिक होता दरम्यान तालुक्याला रात्री उशीरपर्यंत अवकाळीच्या संततधार पावसाने झोडपले होते महसूल च्या प्रशासनाने रात्री उशिरा घटनेचा पंचनामा केला आहे. 

तहसीलदार रमेश जसवंत यांच्यासह आपत्ती निवारण पथक सोयगाव तालुक्यात सज्ज झाले होते उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम यांनी तहसीलदार रमेश जसवंत यांचेकडून घटनेची माहिती घेतली.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...