Friday, 7 April 2023

धामापूर मो-याचीवाडी येथे एकता प्रतिष्ठान मुंबई समूहातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

धामापूर मो-याचीवाडी येथे एकता प्रतिष्ठान मुंबई समूहातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

मुंबई - ( दिपक कारकर ) :

कोल्हापूर जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असणाऱ्या चंदगड तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात डोंगराळ भागात धामापूर मो-याचीवाडी ही दोन गावे वसली आहेत. दोन्ही गावची लोकसंख्या ही ९०० च्या आसपास आहे, ह्या गावी सर्व धार्मिक सण/ उत्सव/ परंपरा किंवा इतर गावकीचे निर्णय हे एकच असतात गावाची जास्त प्रमाणात मुले ही उदरनिर्वाहसाठी मुंबई,पुणे कोल्हापूर या ठिकाणी असतात गावात काही धार्मिक कार्यक्रम असला की सर्व चाकरमानी मोठ्या उत्साहात गावी येतात. ही परंपरा आजही अबाधित आहे. या दोन्ही गावात अनेक मंडळ आहेत भजनी मंडळ, बेंजो पार्टी, सोंगी भजन महिला बचत गट, महिला भजनी मंडळ पंढरपूर वारकरी मंडळ नाट्य मंडळ, देवस्थान कमिटी अश्या प्रकारे ही मंडळे काही कार्यक्रम असला की एकोप्याने एकत्र येतात गावात ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण चालते सध्या गावच्या शाळेसाठी शिक्षक हे प्रामाणिक आणि हुशार लाभले आहेत म्हणून गावच नाव जिल्ह्यात पोचलं आहे. गावात शाळा ही सातवी प्रयत्न आहे त्या शाळेत शिकून गेलेली मुले आजही शाळेसाठी सुशोभित करण्यासाठी नेहमी तत्पर्य  आसतात.

उपरोक्त मंडळातर्फे श्री रवळनाथ मंदिराच्या वर्धापन दिवसाचे औचित्यसाधुन आणि एकता प्रतिष्ठानला दहा वर्षे यशस्वी वाटचाल केल्यामुळे सोमवार दि. १/५/२०२३ रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनरायणाची पूजा आणि सायंकाळी महाप्रसाद आयोजित केला आहे.एकता प्रतिष्ठानने  गेल्या दहा वर्षात गावात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले.मुंबई सारख्या ठिकाणी गावाकडून उदरनिर्वाह करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक चाकरमानी मुलांना राहण्यासाठी सोय व्हावी या विचारांनी गुंडू विष्णू झेंडे यांच्या मनात एक कल्पना आली आपली धामापूर मोऱ्याचीवाडी मधील मुलं एकत्र येऊन प्रत्येकी ठरावीक रक्कम दरमहा काढून खूप काही चांगल्या गोष्टी करता येतील मुलांना मुंबई मध्ये राहण्याचा प्रश्न मार्गी लागेल त्यानी हा विषय ठराविक मुलांच्या कानावर घातला,संतोष गुडुळकर,अरुण गावडे,सागर जोतिबा गावडे,विठ्ठल सुतार गोपाळ मोरे, संदीप रवळु मोरे आणि सर्वांना एकत्रित करणारे  संघटक दशरथ गुडुळकर यांनी सर्वांपर्यंत तळागळाशी जाऊन विषय पोहचवला एकता प्रतिष्ठान मध्ये सुरवातीला २२ सभासद होते  कालांतराने ३८ सभासद झाले आज गेली दहा वर्षे अध्यक्ष म्हणून गुंडू विष्णू झेंडे,उपाध्यक्ष नामदेव गावडे तर कार्याध्यक्ष आत्माराम गुडुळकर आणि सेक्रेटरी जयवंत गुडुळकर उपसेक्रेटरी सागर सिताराम गावडे, खजिनदार युवराज गावडे हे अगदी चोख जबाबदारी पार पाडतात आणि पदभार सांभाळतात.सर्वांच्या मेहनतीने आज मध्यमुंबई मध्ये दोन रूम एकताच्या मालकीच्या असुन उदरनिर्वाहला येणाऱ्या मुलांचा प्रश्न मार्गी लागून पुढे एकता मधील बऱ्याच सभासदांनी मुंबई मध्ये आपली स्वत:ची घरे ही घेतली आहेत.एकता प्रतिष्ठानला पुढे नेहण्यासाठी सर्वांचे खुप मोठे योगदान आहे.एकता मध्ये कोणताही निर्णय सर्वांच्या विचाराने घेतला जातो गेली दहा वर्षात एकताने गावच्या सामाजिक कामात मोठं योगदान दिलं आहे.गावच्या बाकी लोकांना एकत्र करून गावची शाळा डिजीटल करणे,सर्वांच्या सहमतांनी स्व-रक्कम जमा करून सन २०१९ रोजी ३ लाख २५ हजारची कमानी बांधून सामाजिक बांधिलकीचा वेगळा आदर्श घडविला.गावात श्री रवळनाथ मंदिर आहे,त्या मंदिरासाठी  मोठा आर्थिक निधी सर्वांच्या सहमतांनी चाकरमानी यांनी दिला आहे.तसेच मो-याचीवाडी मध्ये एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे हे मंदिर सीताराम नारायण मोरे यांनी स्वतः बांधून गावात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यात्रे साठी दरवर्षी कार्यक्रम आयोजित केला जातो गेली दहा वर्षे यात्रेत ऐतिहासिक नाटकांचे आयोजन केले जाते,गावातील कोणी मोठ्या आजाराशी झुंज देत असेल तर त्याला एक हात मदतीचा देऊन त्याला संकटातून बाहेर काढलं जाते अशा प्रकारे सर्वांच्या दुःखात  सर्वजण खारीचा वाटा उचलतात गावच्या लोकांना एकत्र करून पंचक्रोशीत एक वेगळा आदर्श देण्याचा प्रयत्न नेहमी गावचे होतकरू तरुण करत आहेत.एकता प्रतिष्ठानची दहा वर्ष देव रवळनाथ महाराज यांच्या कृपेने यशस्वी वाटचाल करीत आहेत.हया गावच्या होतकरू तरुणांच्या पुढाकाराने एक वेगळा आदर्श तालुक्यात निर्माण केला आहे.ह्याचे अनेकांकडून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...