Friday, 14 April 2023

जळगाव जिल्हा शिवसेनेची पाचोरा येथे १५ एप्रिल रोजी तातडीची बैठक !

जळगाव जिल्हा शिवसेनेची पाचोरा येथे १५ एप्रिल रोजी तातडीची बैठक !

जळगाव/पाचोरा, अखलाख देशमुख, दि १४ : शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धवसाहेब ठाकरे २३ एप्रिल २०२३ रोजी जळगांव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

या दौऱ्याच्या नियोजनासाठी शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महापौर सौ.जयश्रीताई सुनील महाजन, उप-महापौर कुलभूषण पाटील, निर्मल सिड्सच्या संचालिका सौ.वैशालीताई सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची बैठक रविवार दिनांक १५ एप्रिल रोजी पाचोरा येथे दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
तरी या महत्वाच्या बैठकीसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख, संघटक, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख, तालुका संघटक, शहर संघटक, पंचायत समिती सदस्य, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, समन्वयक, महिला आघाडी, युवासेना, अल्पसंख्यांक आघाडी, विविध शिवसेना अंगीकृत संघटनेतील सर्व सन्माननीय पदाधिकारी व शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, डॉ हर्षल माने,दिपकसिंग राजपुत, प्रा समाधान महाजन,शरद तायडे, गजानन मालपुरे, महानंदाताई पाटील, विराज कावडिया, निलेश चौधरी, चंद्रकांत शर्मा, पियुष गांधी यांनी केले आहे.

बैठक १५ एप्रिल ला दुपारी ३ वाजता बोहरी फार्म, अंतुर्ली फाटा, निर्मल सिडस पाचोरा येथे ठेवण्यात आली आहे.
   
आयोजक-
*शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा जळगांव.*

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...