अंबरनाथ येथे मराठी फिल्म फेस्टीवलचा पुरस्कार सोहळा संपन्न !
*अंबर भरारी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचे यशस्वी आयोजन*
अंबरनाथ, प्रकाश संकपाळ :- अंबरनाथ पूर्व, गावदेवी मैदान येथे अंबर भरारी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा” हा अंबरनाथचा सांस्कृतिक वारसा जपणारा सोहळा आज अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष श्री. सुनील चौधरी, श्री. गुणवंत खेरोदिया, श्री. निखिल चौधरी यांनी आयोजित केला असून या कार्यक्रमास भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती दर्शवत या सोहळ्याची शान वाढवली.
यावेळी सुनील चौधरी यांनी सांगितले की या फेस्टिव्हलचे आठवे वर्ष असून अगदी कोरोना काळात सुध्दा यांचे आयोजन केले होते, दरवर्षी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. फेस्टिव्हलचे दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी सांगितले की ही संकल्पना मी अंबरनाथचे मा. नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या कडे घेऊन गेलो असता त्यांनी मला सहकार्य केले व आज त्यामुळेच कार्यक्रमाचे आठ वर्षे पूर्ण केली आहेत.
अंबरनाथ चे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी उपस्थित राहून आयोजित कार्यक्रमाचा आनंद लुटला व या प्रसंगी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सर्व कलाकारांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment