Sunday, 21 May 2023

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत RRR केंद्रे स्थापन !

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत RRR केंद्रे स्थापन !

                             RRR सेंटर्स ची यादी

कल्याण, नारायण सुरोशी : केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने (MoHUA) "मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर" हे अभियान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत केंद्र शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार RRR (Reduce, reuse and recycle) centre प्रत्येक प्रभागात दि.20/5/2023 पासून सुरू करण्यात आले आहेत. सदर केंद्रावर नागरिकांनी जुने स्वच्छ व सुस्थितीतील कपडे, वापरलेली पुस्तके ,चप्पल, बूट, खेळणी,प्लास्टिक वस्तु, जुनी भांडी इत्यादीं जे गरजूंना वापरता येतील अशा वस्तु आपल्या नजीकच्या केंद्रावर दैनंदिन सकाळी 7.00 ते दु.1.00 वाजता दि.5/6/2023  पर्यंत जमा करण्याचे आहेत. तसेच इतर नागरिक याना प्रोत्साहन देऊन जनजागृतीपर संदेश द्यावयाचे आहेत. जेणेकरून शहरातील सुका कचरा रस्त्यावर पडणार नाही आणि शहर स्वच्छ ठेवण्यास मदत होईल.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...