सरपंच चषक उमराठ ग्रामीण- पर्व पहिले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद !
[ निवोशी/गुहागर : उदय दणदणे ]
_सरपंच चषक उमराठ (ग्रामिण पर्व पहिले) - सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा एक क्षण उमराठ ग्रामपंचायत आणि उमराठ गावाच्या भाग्याचा - मैत्री पुर्ण लढतीचा_
गुहागर तालुक्यातील मौजे उमराठ गावातील खेळाडूंना खेळण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे आणि त्या माध्यमातून सर्व खेळाडूंना आपलं खेळ-कौशल्य सादर करता यावे तसेच तरूण खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, गावातील सामाजिक सलोखा जपला जावा आणि गावातील शहरी भागातील खेळाडू गावाकडे यावे या हेतूने आणि संकल्पने ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या सहकार्यांने उमराठ गावातील स्थानिक तरूण मंडळींनी गावातील मुंबईकर मंडळींच्या सहभागाने आणि सहकार्यांने सदर सरपंच चषक उमराठ स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. १३ आणि रविवार दि. १४ मे २०२३ रोजी उमराठच्या घाडेवाडी येथील बाऊल नगरीत करण्यात आले होते.
सदर स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. १३ मे २०२३ रोजी सकाळी ९.३० वा. सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन, श्री गणेशाची पुजा, ग्रामदेवता श्री नवलाई देवी, महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि खेळपट्टीची पुजा व श्रीफळ वाढवून मोठ्या उत्साहात ग्रामस्थांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी गावातील विविध वाडी प्रमुख, प्रतिष्ठित ग्रामस्थ महिला व पुरुष तसेच प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
गावातील वाड्या-वाड्या मधील १२ संघानी सहभाग घेतला होता. सर्वच संघांची कामगिरी अतिशय उत्कृष्ट आणि परिपूर्ण होती. त्यामुळे स्पर्धा अतिशय चुरशीची आणि क्षणाक्षणाला उत्कटा/ उत्सुकता वाढणारी होती. स्पर्धेत ज्या संघाचे मैदानावर क्षेत्ररक्षण, क्षेत्ररचना, फलंदाजी आणि गोलंदाजी उत्तम असते ते संघ गुणवत्तेनुसार पुढे-पुढे येत असतात. त्या प्रमाणे अतितटीच्या आणि चुरशीच्या लढतीत अंतीम विजेते पदाचे मानकरी ठरला आंबेकरवाडीचा श्री भराडा क्रिकेट संघ आणि उपविजेता ठरला तो डागवाडीचा जागलेश्वर क्रिकेट संघ. तसेच मॅन ऑफ द सिरीज - ओमकार आंबेकर, सर्वोत्कृष्ट फलंदाज - अमित आंबेकर तर सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे मानकरी ठरले शेखर आंबेकर. अंतिम विजेता आणि उपविजेता ठरलेल्या संघांबरोबरच सर्व सहभागी संघांचे समारोप प्रसंगी सरपंच जनार्दन आंबेकर यांनी अभिनंदन सह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे स्पर्धेतील "श्री भराडा क्रिकेट संघातून" पवन आंबेकर, शिल्पकार संघातून आयुष कदम, जालगावकर क्रिकेट संघातून यश कदम, यश जालगावकर, कोंडवीवाडी क्रिकेट संघातून राज गावणंग आणि गोरिवलेवाडी क्रिकेट संघातून भावेश गोरिवले, संस्कार गोरिवले आणि संचित गोरिवले हे १२ आणि १२ वर्षांखालील खेळणारे नवोदित किशोरवयीन खेळाडू. यांचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी या सर्वांचे अभिनंदन आणि भरभरून कौतुक करून व पुष्पगुच्छ देऊन खास सन्मान केला आणि असेच उत्तम खेळाडू आपल्या उमराठ गावातून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पुढे गेले पाहिजेत असे सांगितले.
गुहागर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष चैतन्य धोपावकर तसेच वेळणेश्वर जि.प. गटाच्या माजी सदस्या नेत्राताई ठाकूर यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अव्वल दर्जाचे समालोचन (काॅमेट्री) विवेक आंबेकर, सचिन आंबेकर, विकास आंबेकर, निनाद कदम, वैभव धनावडे आणि उमेश गावणंग यांनी करून स्पर्धा अधिक रंगतदार केली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या तसेच आर्थिक देणगी देऊन मोलाचे सहकार्य केले असे सर्वांचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment