Monday, 15 May 2023

महाराष्ट्र शासन खादी ग्रामोद्योग मंडळ संचलित गुहागर तालुका औद्योगिक बहुउद्देशिय ग्रामीण सहकारी संस्था मर्यादित गुहागर तालुका अध्यक्ष पदी ॲड. सुशिल अवेरे तर उपाध्यक्ष पदी ॲड. मयूर कानसे यांची निवड !

महाराष्ट्र शासन खादी ग्रामोद्योग मंडळ संचलित गुहागर तालुका औद्योगिक बहुउद्देशिय ग्रामीण सहकारी संस्था मर्यादित गुहागर तालुका अध्यक्ष पदी ॲड. सुशिल अवेरे तर उपाध्यक्ष पदी ॲड. मयूर कानसे यांची निवड !

[ कोकण/ गुहागर - उदय दणदणे ]

       महाराष्ट्र शासन खादी ग्रामोद्योग मंडळ संचलित शासन अंगीकृत गुहागर तालुका औद्योगिक बहुउद्देशिय ग्रामीण सहकारी संस्था मर्यादित, गुहागर तालुका अध्यक्ष पदी ॲड. सुशिल अवेरे यांची प्रचंड बहुमतांनी निवड तर उपाध्यक्ष पदी ॲड. मयूर कानसे यांची निवड !
         गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी, मध्यवर्ती बाजारपेठ शृंगारतळी येथे असलेल्या "महाराष्ट्र शासन खादी ग्रामोद्योग मंडळ" संचलित शासन अंगीकृत गुहागर तालुका औद्योगिक बहुउद्देशिय ग्रामीण सहकारी संस्था मर्यादित, गुहागर तालुका अध्यक्ष पदी ॲड. सुशिल अवेरे तर उपाध्यक्षपदी ॲड. मयूर कानसे यांची निवड सर्व संचालकांच्या वतीने करण्यात आली‌. सदर संस्थेचे कार्यालय शृंगारतळी येथे असून सदर संस्थेची संचालक निवड मागील महिन्यामध्ये पार पडली होती. या निवडणुकीमध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष- विजय चंद्रकांत लांजेकर व त्यांच्या पत्नी सौ. विभावरी विजय लांजेकर, मंगेश रामदास कोंडविलकर, प्रफुल्ल सुधीर विखारे, सत्यवान दत्ताराम नांदलस्कर, अमीत अनंत अवेरे, किरण गोपाळ अवेरे, मयूर बाळकृष्ण कानसे, संतोष बाळू आग्रे, शलाका चंद्रकांत काष्टे आणि ॲड. सुशिल अवेरे हे संचालक म्हणून निवडून आले होते, आज सोमवार दिनांक- १५ मे २०२३ रोजी सर्व संचालाकांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक पार पडली त्यामध्ये एकमताने  उपाध्यक्षपदी ॲड. मयूर कानसे यांची तर ॲड. सुशिल अवेरे यांची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. विजयाचा आनंद फटाक्यांच्या आतिषबाजीत त्याचबरोबर  सर्व संचालकांनी एकमेकांना पेढे भरवून केले. रत्नागिरी जिल्ह्यातून सर्व संचालाकांचे अभिनंदन केले जात आहे. तसेच अध्यक्षपदी गुहागर तालुक्याचे कार्यकुशल नेतृत्व ॲड. सुशिल अवेरे यांची निवड झाल्याबद्दल सर्व सामान्य सभासद  व नागरिक यांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी संस्थेचे सचिव- अमित नंदकुमार इंदुलकर व निवडणूक अधिकारी म्हणून एकनाथ सुरेश साळुंखे  यांनी काम पाहिले. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सर्व संचालकांना सोबत घेऊन, गुहागर तालुक्यातील अनेक क्षेत्रातील मान्यवर व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे नूतन अध्यक्ष ॲड. सुशिल अवेरे यांनी सांगितले .

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...