Monday, 15 May 2023

धनवाडी रस्त्याचे काम चालू..वाहतूक बंद ! ..ग्रामस्थांचे प्रवाशांचे हाल..! ! भाकपचा इशारा...

धनवाडी रस्त्याचे काम चालू..वाहतूक बंद ! ..ग्रामस्थांचे प्रवाशांचे हाल..! ! भाकपचा इशारा...

चोपडा, प्रतिनिधी.. तालुक्यातील धनवाडी रस्त्यावर काम चालू केले असून पर्यायी रस्ता न काढल्याने या गावावरून जाणाऱ्या कोलंबा, वडगाव, सिम, कठोरा, संपूले या गावांतील सुमारे १० हजार लोकसंख्येला एस टी, परिवहन सेवा बंद झाल्याने हाल होत आहे‌. काम सुरू करणे अगोदर पर्यायी रस्ता काढणं अत्यंत आवश्यक होते.

पण तो न काढल्याने  वाहतूक बंद झाली आहे, त्यामुळे त्या त्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी तसेच विद्यार्थी, महिला यांचे हाल होत आहेत व नुकसान होत आहे त्याच्याबरोबर एस टी महामंडळाचे उत्पन्न बंद झाले, सदर काम सुरू करण्या अगोदर धनवाडी गावाजवळ सनपूले कडे जाणारा पर्यायी रस्ता आहे. संपूले गाव चौफुली वरून एसटी वाहतूक वळवता येऊ शकते, परंतु एसटी महामंडळाच्या नियोजन शून्य कारभारामुळे रस्ता उपलब्ध असताना तो काढण्यात आलेला नाही, त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत, ह्या रस्त्याचे काम बऱ्याच वर्षानंतर होत असले तरी धनवाडी गावावरून वाहतूक सुरू करावी  अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँ. अमृत महाजन, शांताराम पाटील, छोटू पाटील, भगवान पाटील, ताराबाई भील, संजय पाटील, अतुल भील, किरण पाटील, आदींनी केली असून पर्यायी रस्ता वरून वाहतूक सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे‌.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...