विनवळ गावात आदिवासी बोहाडा उत्सव उत्साहात साजरा !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
बोहाडा अर्थात (जगदंबा मातेचा उत्सव) तीन दिवस रात्री विनवळ गावात बोहाडा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या, बोहाड्यात लोकांनी बोहाडा बघण्यासाठी तुफान गर्दी केली होती. बोहाड्यात मुलांना मनोरंजनासाठी पाळणे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी खाऊ मिठाई, कटरली अशा अनेक दुकांनावर खरेदी साठी भाविकांनी ताव मारला या बोहाड्यात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची दुकाने सुध्दा आली होती.
बोहडा उत्सव तीन दिवस रात्रभर साजरा केला जातो. विविध प्रकाराचे देवदेवतांचे मुखवटे डोक्यावर बांधून व वेष परिधान करून पारंपरिक सांबळ वाद्याच्या तालावर एका विशिष्ट पद्धतीने सोंगे नाचवतात. गेल्या अनेक वर्षांची परंपरा कायम आहे.
बोहाडा उत्सावात निसर्गाशी संबंधित गणपती, शारदा, सूर्यदेव, मारुती, सटवाई, एकादशी, चंद्रदेव, खंडेराव, महादेव, विष्णू, पवनदेव, ब्रह्मदेव, अग्निदेव, वाघ आणि रावणाचे मुखवटे घालून तशी वेशभूषा केली जाते. भक्तांच्या हातातील टेंभ्याच्या उजेडात ही सोंगे पहाटेपर्यंत नाचवली जातात,
विनवळ गावांतील गावदेवी जगदंबा अर्थात बोहाडा उत्सवाच्या पहिल्या दिवशी लहान बोहाडा म्हणजेच थाप आणि दुसऱ्या दिवशी धाकटा बोहाडा आणि तिसऱ्या दिवशी मोठा बोहाडा असे स्वरूप असते. त्याच दिवशी सकाळी देवीची महापूजा करून गावातून रावण व देवीचे युद्ध आणि मिरवणूक होऊन बोहाडा उत्सवाची सांगता करण्यात आली.
No comments:
Post a Comment