रेणुका फाऊंडेशन व वरूण पाटील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शिलाई मशीन वाटप !!
कल्याण, प्रतिनिधी : कल्याण टिळक चौक येथे रेणुका फाऊंडेशन व वरूण पाटील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वयंरोजगार अंतर्गत, विधवा महिलांसाठी मोफत शिलाई मशीन वाटप तसेच प्रशिक्षण शिबीराची सांगता आज झाली, दिनांक १ मे ते १३ में पर्यन्त चाललेल्या प्रशिक्षण शिबिरास महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला,
रेणुका फाऊंडेशन अध्यक्षा शितल देवळालकर, सचिव रोहन पोवार, खजिनदार दिप्ती रोहन पोवार, यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शिबिराचे उद्घाटन श्री वरूण पाटील (भाजपा नगरसेवक तसेच वरूण पाटील फाऊंडेशन अध्यक्ष) यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी, विजय पाटील (काॅग्रेस जिल्हा उपाध्यक्ष), स्वप्नील एरंडे (समाजसेवक), सागर भालेकर (उद्योजक व समाजसेवक), शितल विखणकर (मनसे महिला सेना शहर अध्यक्ष) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
दि १३ में रोजी लाभार्थी महिलांना शिलाई मशीन वाटप व प्रशिक्षण शिबीराची सांगता झाली या कार्यक्रमाला विषेश अतिथी म्हणून मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, स्वप्नील एरंडे, वासंती जाधव (मनसे महिला सेना जिल्हा उपाध्यक्ष), शितल विखणकर हे उपस्थित होते.
या शिलाई मशीन प्रशिक्षण व वाटपाचा लाभ कल्याण पूर्व व पश्चिम विभागातील महिलांनी घेतला.
No comments:
Post a Comment