जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व शिवसेना आयोजित नालासोपारातील नागरीकांचे मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर संपन्न !
वसई, प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व शिवसेना आयोजित नालासोपारा येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर ठेवण्यात आले होते.
शिबीरास नागरीकांचा उत्सुर्फ प्रतिसाद लाभला एकुण 90 नागरीकांची नेत्र तपासणी करण्यात आली 13 रूग्णांना मोतीबिंदु शस्त्रक्रिया साठी भक्तीवेदांत हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले.
रूग्णांना घेऊन जाण्यापासून ते आणण्यापर्यंत सर्व नियोजनबद्ध सोय करण्यात आली होती. मोतिबिंदु शस्त्रक्रियेनंतर सर्व नागरीकांना आपापल्या घरी सुखरूप पोहचवण्यात आले.
शिबीराचे उध्दघाटन युवा सामाजिक कार्यकर्ते गणेश हरिश्चंद्र सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिजाऊ तालुकाध्यक्ष हर्षालीताई खानविलकर, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, शहरप्रमुख समीर गोलांबडे, उपशहरप्रमुख आनंद नगरकर, उपशहरप्रमुख महेश निकम विभागप्रमुख गणेश मुनगेकर व जिजाऊ संस्थेचे स्वयंसेवक उपस्थित होते
No comments:
Post a Comment