Saturday, 20 May 2023

जिजाऊ संस्थेच्या वतिने नालासोपारातील महिलांसाठी मोफत मेहंदी प्रशिक्षणाचे उध्दघाटन...

जिजाऊ संस्थेच्या वतिने नालासोपारातील महिलांसाठी मोफत मेहंदी प्रशिक्षणाचे उध्दघाटन...

वसई, प्रतिनिधी : महिला फक्त चुल, मुल,घर या चौकटीत न राहता तीच्या  कलागुणांना वाव मिळावा या हेतूने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने नालासोपारातील महिलांसाठी मोफत मेहंदी प्रशिक्षण वर्ग समेळपाडा येथे  सुरू करण्यात आला आहे. 

प्रशिक्षण पुर्ण करणारया महिलांना  प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. महिलांच्या कौटुंबिक आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी यातुन शाश्वत उपजीविका निर्माण व्हावी यासाठी जिजाऊ संस्था नेहमी मदत करत असते.

जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती संदेश ढोणे यांच्या हस्ते उध्दघाटन करण्यात आले. यावेळी जिजाऊ तालुकाध्यक्ष हर्षालीताई खानविलकर शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक व महिला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...