शहरातून थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करावे - खासदार जलील
*नागरी विमान वाहतूक समितीच्या बैठकीत नांदेडहून उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा मुद्दा हि उपस्थित केला*
नवी दिल्ली, अखलाख देशमुख : केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना नांदेड आणि अमृतसर दरम्यान विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी लवकरच सर्व संबंधितांशी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. विशेषत: सौदी अरेबियातील जेद्दाहसाठी थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याच्या शक्यतांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले जेणेकरुन उमराह करण्यासाठी मक्का आणि मदिना येथे जाणाऱ्या मुस्लिम यात्रेकरूंना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळू शकेल.
जलील यांनी नांदेडहून उड्डाणे सुरु नसल्याचा मुद्दा हि उपस्थित केला; ज्यामुळे हजारो शीख यात्रेकरूंची नांदेड आणि अमृतसरमधील दोन सर्वात आदरणीय प्रार्थनास्थळांना भेट देणार्यांची मोठी गैरसोय होत आहे. राज्य सरकारने त्यात एवढा पैसा गुंतवला असताना नांदेड विमानतळ अंबानींच्या ताब्यात का देण्यात आले, असा आक्षेपही त्यांनी घेतला. नागरी विमान वाहतूक विषयक संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, ज्याचे औरंगाबादचे खासदार देखील सदस्य आहेत.
जलील यांनी मुंबई विमानतळावरील गर्दी कमी करण्याची आणि समृद्धीमुळे चांगली रस्ते जोडणी असल्याने विदर्भातील यात्रेकरूंसाठीही फायदेशीर ठरणार असल्याने उमराहसाठी थेट जेद्दाहला औरंगाबादेतून उड्डाणे सुरु करण्याची गरज असल्याचा मुद्दा अधोरेखित केला.
‘‘आमच्याकडे अजिंठा आणि एलोरा येथे दोन जागतिक वारसा स्थळे आहेत. चांगली हवाई कनेक्टिव्हिटी म्हणजे अधिक पर्यटक शहरात येतील.'' औरंगाबादमध्ये मोठे विमानतळ उभारण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असताना त्याचा पूर्ण क्षमतेने उपयोग का होत नाही, असा सवालही जलील यांनी केला.
खासदार जलील यांनी ट्रॅव्हल एजंट्सची पत्रेही दिले ज्यात उमराहसाठी प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी औरंगाबाद विमानतळावरून विमानसेवा सुरू करणाऱ्या विमान कंपन्यांची तिकिटे अगोदर खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे. खाजगी विमान कंपन्यांना दुबई आणि सिंगापूरला थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवण्यासाठी दरवाजे उघडतील, असे ते म्हणाले.
जलील यांनी नंतर नागरी उड्डाण सचिवांशी औरंगाबादहून दुबई आणि सिंगापूरसारख्या ठिकाणी नवीन उड्डाणे सुरू करण्याबाबत चर्चा केली. आपल्या विमानतळावर वर्दळ वाढविण्याच्या विविध मार्ग व माध्यमांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
No comments:
Post a Comment