Wednesday, 3 May 2023

*@ ३ मे @**जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन*

*@ ३ मे @*
*जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन*
********************************

आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन (World Press Freedom Day). विविध विचारधारेची वृत्तपत्रं जगभर निघत असतात. त्यांची वैचारिक गळचेपी होऊ नये म्हणून हा दिवस 'जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्यदिन' म्हणून पाळला जातो. यामागचा उद्देश जनते मध्ये माध्यमांप्रती जागरुकता निर्माण करणे हा आहे. हा दिवस स्वतंत्र आणि खंबीर पत्रकारांना अविरत पाठींबा दर्शविणारा दिवस आहे. १९९१ मध्ये आफ्रिकेतील पत्रकारांनी पत्रकारांच्या स्वातंत्र्यासाठी पुढाकार घेऊन एका विशेष मोहीमेला सुरुवात केली. 

३ मे १९९१ रोजी नामेबियाची राजधानी विंडहोक येथे पत्रकारांची परिषद भरली होती. या परिषदेत पत्रकारांच्या लिखाणाच्या स्वातंत्र्यांचा जाहीरनामा (Declaration of Windhoek) प्रसिद्ध झाला. त्याच्या १९९२ पासून ३ मे हा दिवस प्रेस फ्रिडम डे (प्रेस स्वातंत्र्य दिन) म्हणून साजरा केला जाऊ लागला. १९९३ मध्ये युनेस्कोने जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास मंजुरी दिली. जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी दरवर्षी एक विशेष थीम ठेवलेली जाते. या दिवसाच्या तमाम पत्रकार मित्रांना मन:पूर्वक शुभेच्छा !

लेखन - अखलाख देशमुख 

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...