शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमाचा जनतेने फायदा घ्यावा - प्रदिप वाघ
जव्हार, जितेंद्र मोरघा :
महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत शासकीय योजनांची जत्रा या अभियानात मोखाडा तालुक्यातील १३ ठिकाणी दिनांक ४ मे ते २३ मे पर्यंत तलाठी सजा वार शिबिर आयोजित केले असून, या अंतर्गत अनेक शासकीय योजनांचे अर्ज भरुन घेतले जाणार आहेत, तसेच विविध दाखल्यासाठी साठी देखील अर्ज दाखल करता येणार आहे,या योजनेचा फायदा सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्रदीप वाघ उपसभापती यांनी जनतेला केले आहे.
तसेच गतिमान व लोकाभिमुख निर्णय घेणार्या शासनाचे व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे आभार देखिल प्रदीप वाघ यांनी मानले आहेत
No comments:
Post a Comment