गावाची आयुष्यभर सफाई करणाऱ्या कामगार महिलेवर शौचालय व घरकुल ध्या .. कॉम्रेड अमृत महाजन
रावेर, प्रतिनिधी.. तालुक्यातील वाघोडा बू येठी ,श्रीमती दुर्गाबाई बाबूराव रल यानी १९९० पासून ग्रामपंचायत अंतर्गत घाण काम करीत आहेत अत्यंत कमी पगारावर त्यांनी काम केले राहणीमान भत्ता ही त्यांना दिलेला नाहीत कायदेशीर वेतन न देता तसेच प्रा फंड वेळेवर भरणा न करता हक्काचे घरकुल सुद्धा दिले नाही यावरून सफाई कामगारांच्या बाबतीत पंचायतीचा दृष्टिकोन बरोबर नाही, त्यांना तात्पुरती निवास व्यवस्था म्हणून ग्रामपंचायतच्या शेडमध्ये व्यवस्था करून दिली तेथे त्या गेल्या पंचवीस वर्षापासून राहत आहेत त्यांच्या मुलांची लग्न ,पतीचे निधन त्याच ठिकाणी झाले.
आता सरकारने "प्रत्येक घरी शौचालयाची योजना" आनलेली आहे. वाघोदा गावामध्ये सुद्धा ती योजना राबवली जात आहे. असे असताना सफाई कर्मचारी वयोवृध्द महिला यांनी शौचालय बांधून देण्यासाठी 20 फुटावर खड्डे खोदल्या असता त्यासाठी शौचालय बनवण्यास ग्राम पंचायत मज्जाव करीत आहे ज्या कामगारांनी ज्या कर्मचाऱ्यांनी मल मूत्र साफ केले अशा कामगारांना वयोवृध्द झाल्या नंतर शौचालय नाकारणे म्हणजे अन्याय अत्याचार होय मानवी हक्काचे उल्लंघन होय या महिला कर्मचारी शौचालयासकट घरकुल देण्यासाठी ग्रामपंचायत बांधील आहे त्यासाठी त्यांनी दोन जागांच्या पर्याय दिलेला आहे दोन पर्यायांपैकी कुठलाही पर्याय मंजूर राहील असे श्रीमती दुर्गा यांनी ग्रामपंचायतला कळवले असून हातप्पा ज्या ठिकाणी त्या पंचवीस वर्षांपासून रहिवास करत आहेत त्या ठिकाणी शासकीय नियमाप्रमाणे घरकुलासाठी जागा मोजून दिली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे या जागेची पाहणी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे नेते का अमृत महाजन यांनी केले असून पंचायतीला तसे कळवलेले आहे तरी सफाई कर्मचाऱ्यास सेवा निवृत्तीनंतर हाल होऊ नये म्हणून शौचालय घरकुल व . शौचालय बांधून द्यावे निवेदनाच्या प्रती रावेर पंचायत समिती गटविकास अधिकारी तहसीलदार रावेर व ग्रामपंचायत कार्यालय वाघोदा बुद्रुक यांना दिलेले आहे अशी माहिती कर्मचारी महासंघ आयटक चे राज्य सचिव कॉम्रेड अमृत महाजन यांनी दिले आहे श्रीमती यांना न्याय देनेसाठी वाल्मिकी समाजाचे सरपंच श्री शंकर दरी, संजय कंडारे ,दिलीप आदिवाल राजकुमार डावरे हेही कार्य रत आहेत
No comments:
Post a Comment