"चला जानुया नदीला" या अभियानाच्या जलनायक डॉ.स्नेहल दोंदे यांनी ग्रुप ग्रामपंचायत रायते येथे दिली भेट !
यावेळी नदीभागाची पाहणी करुन, पाण्याचे नमुने तपासण्यात आले, वरच्या भागातून वाहत येणारे दुषित पाणी याबात बदलापुरचे आयुक्त व एम.आय.डी.सी.अधिकारी यांना भेटून यावर लवकरच उपाय योजना कराव्यात यासाठी पाठपुरावा करत असुन तो लवकरच मार्गी लागणार आहे,यासाठी त्यांनी आज अनेक अधिकारी वर्गाला धारेवर धरले, शहरीभाग व गावपातळीवर नेमकी काय समस्या आहेत याचा सविस्तर रिपोर्ट बनवून जिल्हाधिकारी, जलसंम्पदा मंत्री, यांना अहवाल सादर केला जाणार आहे, गावातील सांडपाणी व कचरा नदीभागात किंवा रस्त्यावर न सोडता त्याची योग्य विल्हेवाट लावावी व उल्हासनदीचे प्रदूषण कसे रोखता येईल याबाबत माहिती दिली. यावेळी कल्याण पंचायत समितीचे प्रभारी गटविस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, पाटबंदारे अधिकारी, जलसंम्पदा अधिकारी, तलाठी,वनविभागाचे कर्मचारी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, नागरिक, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment