Thursday, 4 May 2023

शिवसेना (शिंदे गट) यांच्या पाठपुराव्यातुन समेळगाव स्मशानभूमीत सुशोभिकरण व लाकडे ठेवण्यासाठी शेड बांधण्याचे काम सुरू....

शिवसेना (शिंदे गट) यांच्या पाठपुराव्यातुन समेळगाव स्मशानभूमीत सुशोभिकरण व लाकडे ठेवण्यासाठी शेड बांधण्याचे काम सुरू....

*सौ. रूचिता अमित नाईक* 
*महिला आघाडी शहर संघटक*

वसई, प्रतिनिधी‌ : मरणपावलेल्या व्यक्तीवर चांगल्या वातावरणात अंत्यसंस्कार व्हावेत अशी आप्तेष्ठांची अपेक्षा असते. मात्र अस्वच्छता, लाकडे ठेवण्यासाठी कोणतेही शेड नव्हते, अर्धवट  विद्युत शवदाहिनेचे काम, पडक्या भिंती, पिण्याच्या पाण्याची  अपुरी व्यवस्था अशा अनेक समस्यांमुळे समेळगाव परिसरातील स्मशानभूमींची दूरवस्था झाली होती यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाईकांनाही मनस्ताप सहन करावा लागत होता . स्मशानभूमीसाठी लाखो रुपये दरवर्षी महापालिकेतर्फे खर्च केले जातात मात्र प्रत्यक्षात स्मशानभूमीत विकासकामेच झाली नसल्याचे समोर आले आहे. मग हा पैसा कुठे जातो. 

स्मशानभूमीत लाकडे ठेवण्यासाठी कोणते हि शेड नसल्याने पावसाळ्यात ओले लाकडे असल्याने 2 दिवस सतत टायर ऑईल टाकुन अत्यंसंस्कारासाठी वेळ लागायचा याबाबत शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांनी स्मशानभूमीचा कामासाठी महानगरपालिके समोर  मोठे आमरण उपोषण केले होते याची दखल घेत महानगरपालिकेच्या वतिने स्मशानभूमीतील कामास सुरूवात केली  आहे.

दुसर्‍या  टप्यातील विद्युत शवदाहिनीचे हि काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन आयुक्त अनिल पवार यांनी दिले. याबाबत स्थानिक नागरीकांनी शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांचे आभार मानले..

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...