Sunday, 21 May 2023

३० सप्टेंबर नंतर दोन हजार रुपयांच्या नोटा "दान" पेटीत टाकू नये, श्री."साई " संस्थानने भाविकांना केले आवाहन !!

३० सप्टेंबर नंतर दोन हजार रुपयांच्या नोटा "दान" पेटीत टाकू नये, श्री."साई " संस्थानने भाविकांना केले आवाहन !!

भिवंडी,दिं,२१, अरुण.पाटील (कोपर) :
         दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा  निर्णय आरबीआयने घेतला असून या नंतर शिर्डी "साई" संस्थानने दोन हजार रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबर नंतर श्री. "साई" संस्थानच्या दानपेटील "न" टाकण्याचे आवाहान भाविकांना केले आहे. ३० सप्टेंबर पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा  श्री."साईबाबां" च्या दानपेटीत टाकाव्या, नंतर भाविकांनी त्या नोटा दान पेटीत टाकू नये, असे संस्थानने आवाहन केले आहे.
           रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १९ मे रोजी दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर शिर्डीत श्री."साईबाबा' संस्थान देखील अलर्ट झाले आहे. श्री."साईबाबा" संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पी शिवाशंकर यांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून श्री. "साईबाबां"च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवाहन केले आहे.
         ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांनी "साईबाबां"च्या दानपेटीत दोन हजार रुपयांच्या नोटा टाकाव्यात, ३० सप्टेंबर नंतर भाविकांनी चलनातून बाद होणाऱ्या दोन हजार रुपयांच्या नोटा श्री."साई" संस्थानच्या "दानपेटीत" टाकु नये, असे आवाहन यावेळी श्री. "साईबाबा" संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी शिवशंकर यांनी केले आहे.
          शिर्डी  श्री."साईबाबां"च्या दर्शनासाठी येणारे भाविक साईबाबांच्या दानपेटीत पैसे, दागिने आणि मौल्यवान वस्तूही टाकतात. केंद्र सरकारने  ८ नोव्हेंबर २०१६  रोजी नोटा बंदीचा निर्णय अचानक घेण्यात आला होता. त्यामुळे नोटा बदलून मिळण्याची शक्यता वाटत नसलेल्या, किंवा तो त्रास नको असलेल्या भाविकांनी या नोटा मोठ्या प्रमाणात श्री."साईबाबा" संस्थानच्या दानपेटीत टाकल्या होत्या. श्री."साई" संस्थानकडून नियमितपणे बँकेत भरणा केला जात असल्याने, मुदतीत आलेल्या नोटा बँकेत भरल्या होत्या. मुदत संपल्या  नंतरही सुमारे ४ कोटी रुपयांच्या नोटा संस्थानकडे पडून आहेत.
           या अनुभवावरून आता दोन हजार रुपयांच्या नोट बंदीनंतर काय होईल, याची उत्सुकता आहे. मात्र, मागील वेळी झाला एवढा त्रास आणि गोंधळ यावेळी होण्याची शक्यता कमी आहे. नोटा बदलून घेण्यासाठी पुरेशी मुदत आहे. त्यामुळे लोक नोटा बदलून घेऊ शकतील. शिवाय या नोटा दानपेटीत टाकल्या तरीही फारसा त्रास होणार नाही. साईबाबा संस्थानकडे आलेल्या दानाची मोजणी दर मंगळवारी आणि शुक्रवारी केली जाते. ही रक्कम लगेच बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे दोन हजारांच्या नोटा आल्याच तर त्या लगेच बँकेत जाणार आहेत.
          ३० सप्टेंबर नंतर भाविकांनी दोन हजार रुपयांच्या नोटा श्री. "साई" संस्थानच्या दान पेटीत टाकू नये, असे आवाहन श्री."साईबाबा" संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पी शिवशंकर यांनी केले आहे. श्री."साई" संस्थानच्या झालेल्या काही दिवसातील कँश काऊंटींगमध्ये दान पेटीत दोन हजारांच्या नोटा येण्याचे प्रमाण खूपच घटल असल्याचे समोर आले आहे. मात्र, पूर्वीच्या नोटबंदी नंतर जुन्या नोटा दानपेटीत येण्याचे प्रमाण वाढले होते. तसेच दोन हजाराच्या नोटांचे प्रमाण वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...