Sunday, 21 May 2023

हमें देखना है....राजीव गांधी यांचे टीव्हीवरील हे तीन शब्द !

हमें देखना है....राजीव गांधी यांचे टीव्हीवरील हे तीन शब्द ! 

राजीव गांधी हे काळाच्या पुढचं नेतृत्व होतं. काळाने त्यांच्यावर अकाली घाला घातला. ते देशासाठी शहीद झाले. त्यांच्याबद्दल सध्या संघपरिवारातले लोकं वाईट-साईट लिहून व्हायरल करत असतात, पण मी त्या पिढीची साक्षीदार आहे, जी पिढी राजीव गांधींमुळे घडली. विज्ञान-तंत्रज्ञान यांची कास धरत राजीव गांधींनी देशाला प्रगतीच्या अशा हायवे वर आणलं ज्याची फळे आज आपण सर्वच जणं चाखत आहोत. हमें देखना है, असं म्हणत भाषण सुरू व्हायचं, भाषणात अनेकदा हे तीन शब्द यायचे, पण या तीन शब्दांच्या पुढे मागे राजीवजींचं कालातीत व्हिजन असायचं. गोरगरीब जनतेबद्दल कळवळा, नव्या भारताच्या अपेक्षांना पूर्तीकडे घेऊन जायचे उपाय, नवनवीन कल्पना, कॉम्प्युटर पासून अंतराळापर्यंत विविध क्षेत्रात नवनवे प्रयोग. योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध कल्पना, गव्हर्नन्स साठी कडक उपाययोजना.. राजीव गांधींनी या देशाला आधुनिक बनवलं. त्यांचं जाणं म्हणजे खरोखरच एक पोकळी आहे, ती कशानेही भरून निघू शकत नाही.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...