दोषींवर कारवाई होणार : आमदार सुनिल भुसारा यांनी केली त्या घटनेची पाहणी !
जव्हार,'जितेंद्र मोरघा :
मोखाडा तालुक्यातील सायदे या गावातील बोरीचापाडा येथील सात वर्षीय बालिकेचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला.वेळीत दवाखान्यात नेउनही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला असून यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी या पालकांनी केली या पार्श्वभूमीवर आमदार सुनिल भुसारा यांनी या कुटुंबाची भेट घेतली असूही त्यांचे सांत्वन करतानाच आर्थिक मदतही केली.यावेळी पालघर जिप चे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्याशी तात्काळ फोनवरुन यातील दोषींवर कारवाई करण्याच्या सुचना केल्या आहेत. याशिवाय भुसारा यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा येथेही भेट देवून पाहणी केली.
No comments:
Post a Comment