माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून श्रद्धांजली !!
नवी दिल्ली, प्रतिनिधी : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आज रविवारी राष्ट्रीय राजधानीतील वीर भूमी येथे त्यांच्या 32 व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी श्रद्धांजली वाहिली.
तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनीही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.
20 ऑगस्ट 1944 रोजी जन्मलेले राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदुर येथे निवडणूक रॅलीदरम्यान लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) च्या आत्मघातकी बॉम्बरने हत्या केली.
No comments:
Post a Comment