Sunday, 21 May 2023

शाब्दिक चकमकीच्या गैर समजुतीतुन अनुसूचित जातीच्या अल्पवयीन मुलाची नग्नावस्थेत धिंड काढल्या मुळे दोन समाजात जातीयतेढ निर्माण...

शाब्दिक चकमकीच्या गैर समजुतीतुन अनुसूचित जातीच्या अल्पवयीन मुलाची नग्नावस्थेत धिंड काढल्या मुळे दोन समाजात जातीयतेढ निर्माण...

प्रतिनिधी, (अण्णा पंडित ) :
काही दिवसापूर्वी एका समाजातील देवी देवतां विषयी आक्षेपार्ह पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल झाली होती. कल्याण येथील एका बौद्ध तरुणाने सदरची आक्षेपार्ह पोस्ट समाजमाध्यमावरुन डिलिट करण्याची विनंती सबंधितांना केली होती.तो तरुण बौध्द समाजाचा असल्याने काही सदस्यांचा अहंकार दुखावला गेला. आणि त्या अल्पवयीन तरुणाबद्दल राग व द्वेष भावना मनात ठेवुन त्या तरुणाबाबतीत चुकीचा संदेश समाज माध्यमातून दिला. समुहामधील अतिउत्साही जातीयवादी तरुण तरुणींनी त्या बौद्ध तरुणाचा  शोध घेऊन त्या अल्पवयीन तरुणाचे केकशॉप मधून अपहरण केले निर्जन स्थळी नेऊन त्याला मारझोड करुन न केलेल्या गुन्ह्याची माफी मागायला लावली व त्याचा व्हीडीओ बनवून समाज माध्यमावर प्रसारित केला तसेच त्यांच्या अंगावरचे कपडे काढून त्याची नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. हे सर्व करीत असताना जमावाने त्याला बेदम मारहाण केली. तसेच कल्याणच्या बारावे येथील देवीच्या मंदिरात नेऊन देवीच्या समोर नाक घासायला लावले.संपुर्ण रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत त्याला नाक घासत फरफट नेले. त्याची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली. आणि या सर्व अमानुष अत्याचाराची चित्रफीत बनवून समाज माध्यमातून प्रसारित केली. या गंभीर प्रकरणाची कल्याण खडकपाडा पोलिसांनी दखल घेऊन 25 ते 30 जणांच्या जमावाविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर आत्तापर्यंत पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील कार्ले येथील एकविरा देवी विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विरोधात या अगोदरच हिललाईन पोलीस ठाणे अंबरनाथ येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दुसरीकडे अल्पवयीन बौद्ध तरुणास विनाकारण मारहाण केली जात असताना खडक पाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर केला असता असे निदर्शनास आले की सदर अल्पवयीन तरुणाने पोस्ट डिलिट करण्यास सांगीतले असता शाब्दिक चकमक झाली म्हणून त्याची नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली. या प्रकरणी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस महेंद्र तथा अण्णा पंडित यांनी त्यांचे सहकारी अमित साळवे (प्रतिनिधी बाळकडू ) योगेश्वरी मणी-पाटील (प्रतिनिधी एनएम न्युज ) अ‍ॅड. अजय मोरे, यांचे समवेत नागरी हक्क संरक्षण विभागाच्या  कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सरोज मोकलीकर यांची भेट घेऊन त्याचे प्रतिनिधींसह पिडीत मोहीत गायकवाड याची हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट घेण्यात आली.त्याचेकडून झालेल्या गंभीर प्रकाराबद्दल सविस्तर माहिती घेतली. पिडीताला व त्यांच्या कुटुंबीयांना धिर देवुन सदर प्रकरणी सर्वोत्परी कायदेशीर मदत करण्याची हमी देण्यात आली. या प्रसंगी अजिंठा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजय सावंत, पत्रकार संदेश शिर्के,मनोज गांगुर्डे, करण धनगर, अ‍ॅड जय गायकवाड आणि त्यांची इतर वकील मंडळी उपस्थित होते. सदर गुन्ह्यातील इतर आरोपी व मुख्य आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.सदर गुन्ह्यात अनु.जाती.अनु.जमाती (अत्याचार प्रतिबंध )सुधारीत अधिनियम २०१५ चे कलम ३ (१) (यु), ३(२) (पाच-ए) सह भादवि कलम १२०ब, ३२६ इत्यादी कलमांची वाढ करावी. पिडीत कुटूंबाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे. तसेच पिडीत कुटूंबावर केस मागे घेण्यासाठी भीती घालणारे आणि दबाब टाका-यांना सदर गुन्ह्यात सहआरोपी करावे इत्यादी मागण्या वरिष्ठ समाजसेवक अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अण्णा पंडित यांनी ना.ह.सं पोलीस निरीक्षक सरोज मोकलीकर यांचे समवेत खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे. वरील मागण्यांसंदर्भात अ‍ॅड. अशिष इंगळे यांनी ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...