Sunday, 21 May 2023

आदरणीय भन्ते गौतमरत्न, महेंद्र तथा अण्णा पंडित व असंख्य कार्यकर्ते यांनी जातीय अत्याचार पिडीत *मोहित गायकवाड* याची हॉस्पिटल मध्ये जाऊन घेतली भेट !

आदरणीय भन्ते गौतमरत्न, महेंद्र तथा अण्णा पंडित व असंख्य कार्यकर्ते यांनी जातीय अत्याचार पिडीत *मोहित गायकवाड* याची हॉस्पिटल मध्ये जाऊन घेतली भेट !

कल्याण, प्रतिनिधी : बौद्ध धर्मीय अल्पवयीन जातीय अत्याचार पिडीत *मोहित गायकवाड* याची हॉस्पिटल मध्ये भेट घेऊन त्याला व त्याच्या कुटूंबियांना धिर देण्यात आला. याप्रसंगी *आदरणीय भन्ते गौतमरत्न* यांचे समवेत अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे *प्रदेश सरचिटणीस महेंद्र तथा अण्णा पंडित* आणि विविध संस्था संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

*अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अण्णा पंडित* यांनी पिडीत मोहित गायकवाड यांच्या कडून घडलेल्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन सदर गुन्ह्यात *ॲट्रॉसिटीचे कलम ३(१)(यु), ३(२)(पाच-ए ) सह भादवि १२०-ब, ३२६* कलमांची वाढ करुन मुख्य आरोपींसह इतर आरोपींना तात्काळ अटक करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहने, आरोपींचे मोबाईल जप्त करावेत. तसेच पिडीत कुटूंबाला गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकणाऱ्या यांना गुन्ह्यात सह आरोपी करण्याची मागणी करण्यात केली आहे.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...