कंत्राटी नर्सेस यांना आरोग्य खात्याने सेवेत कायम करावे आयटक शाखेतर्फे धरणे यशस्वी !
जळगाव, प्रतिनिधी.. महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन आयटक या राज्यस्तरीय युनियन तर्फे शहरी व ग्रामीण भागात कार्यरत कंत्राटी ए एन एम व जी एन एन त्यांना महाराष्ट्र शासनाने शासकीय सेवेत समायोजन करावे यासाठी आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी सादर निवेदनात म्हटले आहे की, कंत्राटी नर्सेस यांनी गेल्या कोरोना कालावधीत जीव धोक्यात घालून सेवा केली गेल्या 16 /17 वर्षापासून त्यांना कुठल्याही प्रकारे प्रॉव्हिडंट, पेन्शन व सामाजिक सुरक्षा लागू नाहीत, बारा बारा तास ड्युटी करणाऱ्या ए एन एम व जी एन एम ग्रामीण व शहरी भागात कार्यरत यांना अतिशय तुटपुंजा पगारावर काम करून घेत आहेत. त्यांना आरोग्य खात्यातील रिक्त जागी अनुभवाच्या आधाराने सामावून घ्यावे व नोकरीची शाश्वती मिळावी असे म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय समोर चाललेल्या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. व परिसर आंदोलकांनी दनाणून सोडला.
या आंदोलनात जिल्हाभरातून चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, यावल, फैजपूर, एरंडोल येथील शंभरच्या वर कंत्राटी नर्सेस यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला दुपारी दोन वाजता आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड अमृत महाजन, कंत्राटी नर्सेस युनियनच्या जिल्हाध्यक्ष कॉम्रेड पूनम चौधरी, सचिव कॉ. प्रसाद क्षीरसागर, उपाध्यक्ष कॉ. मंगला दायमा, संपर्कप्रमुख मोहिनी वायकोळे, हेमलता भंगाळे, विद्या पाटील, प्रतिभा सरोदे आदींनी जिल्हाधिकारी मित्तल साहेब यांना निवेदन सादर केले असता, त्यांनी त्यांना आपली मागणी शासनाकडे पाठपुरावा करतो म्हनुन आश्र्वस्त केले. या आंदोलनात नीला कोळी, राहुल सोनवणे, तुषार जगताप, सुनीता देवरे, अनिता भदाणे, वाय टी शिंदे, अनिता महाजन, एस पी देशमुख, साबिरा तडवी, योगिता ठाकूर, रीना बारेला, सविता धनगर, भिकू बाई बोदडे, संगीता सुनीता मुंडे, सुरेखा मेढे, ऑफरिन मोगल, बार्शी पाटील, सुवर्णा ठाकूर, वैशाली बैरागी, संगीता गावित, नवादी बारेला, ज्योती चव्हाण, सरला कढरे, भरती पाटील, लता चौधरी, ज्योती भवरे, ममता वाघोडे आदींनी भाग घेतला
No comments:
Post a Comment