Thursday, 25 May 2023

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश तरडे यांची सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बढती !!

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश तरडे यांची सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बढती !!

*मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात सहायक पोलिस आयुक्त पदी नियुक्ती*

कल्याण, प्रतिनिधी  :- महाराष्‍ट राज्य गृह विभागातर्फे कल्याण शहर वाहतूक शाखेचे वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश मोहनराव तरडे यांची मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त पदी पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. 

श्री. महेश तरडे हे शहर वाहतूक शाखा, कल्याण येथे वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. श्री. महेश तरडे हे सन 1992 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उप निरीक्षक पदावर भरती झाले. त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन, क्राइम ब्रांच खंडणी विरोधी पथक, मुंबई येथे सुरक्षा शाखा, काशीमीरा, भिवंडी (ठाणे ग्रामीण), कळंबोली, तळोजा (नवी मुंबई), तसेच गुन्हे शाखा उल्हासनगर येथे आपल्या उत्कृष्‍ट कामाने लौकीक मिळवला आहे. तसेच त्यांनी त्यांच्या 30 वर्षाच्या सेवा कालावधीत कल्याण येथील दिपक शेट्टी हत्याकांड, उल्हासनगर येथील शिवसेना कार्यकर्ते गोपाल रजवानी हत्याकांड, अंबरनाथ येथील नगरसेवक प्रसन्न कुलकर्णी हत्याकांड, डोंबिवली येथील केबल व्यावसायिक अनंतपालन हत्याकांड, मुंबई येथील हिरे व्यापारी अश्रफ पटेल हत्यांकाड व अशा इतर अनेक गुन्ह्यातील आरोपींना शस्त्रासह अटक करून सदर क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले आहेत. खंडणी विरोधी पथकात असतांना सुरेश मंचेकर गँग, छोटा राजन गँग, शेट्टी गँग तसेच इतर गँगस्टरांच्या टोळयां व गुन्हेगारांचे कंबरडे मोडले. या गँगस्टर विरोधी कारवाईत झालेल्या चकमकेत 11 जणांना यमसदनी धाडण्यात त्यांचा डॅशिंग सहभाग होता विविध गँगच्या 70 खतरनाक गुन्हेगारांना खंडणी घेताना ते पकडण्यात यशस्वी झाले तसेच विविध टोळीच्या गुंडांकडून 9 एम एम कारबाइन गन 9 एम एम पिस्टल 32 बोर रिवाल्वर व इतर 74 देशी विदेशी बनावटीची शस्त्र हस्तगत केली पोलीस खात्याच्या या कामगिरीमुळे कल्याण डोंबिवली ठाणे येथील बिल्डर लॉबी डॉक्टरांनी सुटकेचा विश्वास सोडला होता सध्या शहर वाहतूक उपशाखा कल्याण येथे कार्यरत असतांना कल्याण शहरात विविध विकासकामे प्रगती पथवर होती. त्यांनी शहरातील  वाहतूकीचे उत्कृष्ट नियोजन करून वाहतूक सुरळीत  ठेवली. तसेच वाहतूक शाखे मार्फत विविध कार्यक्रम, शिबीरे मेडिकल कॅम्प आयोजीत करून प्रवासी/नागरीक व वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्व स्पष्‍ट केले. कसूरदार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.  त्यांना त्यांचे आज पर्यंतच्या उत्कृष्‍ट सेवेसाठी सुमारे 571,बक्षीसे व प्रशस्तीपत्रे मिळाली असून वरील चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना ‘‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’’ प्राप्त झाले आहे. श्री महेश मोहनराव तरडे हे वाई गावचे सुपुत्र असून त्यांच्या या सहाय्यक पोलिस आयुक्त पदोन्नती बद्दल व पुढील वाटचालीस सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...