औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष पदी मोईन इनामदार !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १७ : मोईन नजमोद्दीन इनामदार यांची औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचा शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मोईन इनामदार यांची सदर नियुक्ती खासदार, काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांचे आदेशांने तथा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक, प्रभारी मोहम्मद अहेमद खान यांनी नियुक्ती पत्र दिले आहे.
औरंगाबाद काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मोईन इनामदार यांची नियुक्ती झाल्याने काँग्रेसला गती मिळेल काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग मजबुत होणार आहे. मोईन इनामदार यांनी सांगितले की, माझ्या वर विश्वास दाखवून काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाने मला संधी दिली आहे. या संधीचे सोने करणार आहे.
येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकात जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
इनामदार यांनी या नियुक्तीबदल राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी, वाजाहत मिर्झा, मोहम्मद अहेमद खान, औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ लिडर, नासेर नजीर खान व अनिस पटेल यांचे आभार मानले आहे.
मोईन इनामदार यांची शहर अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबदल औरंगाबाद शहरात अभिनंदन होत आहे, तसेच मित्रपरिवाराकडून शुभेच्छा देण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment