Wednesday, 17 May 2023

समाजसेवक सुमित पंडित यांना आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार जाहीर !

समाजसेवक सुमित पंडित यांना आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार जाहीर !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १७ : समाजसेवक सुमित पंडित यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ते करीत असलेल्या रंजल्या गांजल्याची सेवा खरंच समाजापुढे वाखाडण्याजोगी आहे, रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णाची दाढीकटींग करुन स्वच्छ अंघोळ घालून त्यांना मनोविकृती रुग्णालयात दाखल करतात, गरजु रुग्णांना अर्ध्यारात्री वैद्यकिय साहित्य, भोजन, तसेच रक्त, पुरविण्यात दोघेही पती पत्नी देवदूता सारखी मदतीला धावून जाते, बेवारसांचे अंत्यविधी सुध्दा हे दापत्य सु-लक्षी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या व माणुसकी समुहाच्या माध्यमातून करतात, सुमित यांच्या पत्नी पुजा पंडीत ह्या सध्या जटवाडा रोडलगत माणुसकी वृध्दाश्रम चालवतात त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत, उभयतांना सन्मानित करण्यात येणार आहे. समाजसेवक सुमित पंडित यांना या यापूर्वी विविध क्षेत्रातील ९३ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त झुंजार छावा संघटनेच्या वतीने विवीध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सोहळा औरंगाबाद येथे गुरवार दिनांक.१८-०५-२०२३ रोजी आयोजीत करण्यात आला आहे. 

कार्यक्रमाचे आयोजक.

सुनिल कोटकर पाटील संस्थापक अध्यक्ष,व सचीन खरात पाटील प्रदेश सचिव यांनी पुरस्कार जाहीर झाल्याचे निवड समितीतर्फे कळवीले आहे. ह्या पुरस्काराने समाजात सुमित पंडित यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...