सायदे धरणाच्या दुरुस्तीला सुरवात प्रदिप वाघ यांच्या लढ्याला यश !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
मोखाडा तालुक्याची आजची स्थिती म्हणजे चोहीकडे पाणी तरीही हंडे रीकामे अशी असूही धरणांचा तालुका असूनही एकाहि धरणाचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी म्हणा कि सिंचनासाठी म्हणा होत नसल्याचे चित्र आहे. वर्षाननुवर्षे काम चालु असूनही अद्याप धरणांची कामेच पुर्ण नाहीत याहून भयंकर म्हणजे कालव्यांची कामे अपुर्ण असतानाच या धरणाना गळती लागली आहे.
यामुळे खऱ्या अर्थाने सिंचन घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे असाच प्रकार सायदे येथील धरणाच्या बाबतीत घडला असून भर उन्हाळ्यात दुरुस्तीच्या नावाने येथील धरणाचे पाणी सोडून दिले धरणाला गळती लागल्याने पाणीसाठा शुन्यावर आला होता.
मात्र तरीही दुरुस्तीच्या कामाला सुरवात होत नव्हती याबाबत उपसभापती प्रदिप वाघ यांनी शेतकऱ्यांची अडचण मांडत दुरुस्ती तात्काळ व्हावी यासाठी अनेक पत्रव्यवहार केले मात्र संबंधित विभाग बधला नाही यामुळे अखेर यासाठी वाघ यांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर आता अखेर या धरणाच्या दुरुस्तीला सुरवात झाली आहे.
No comments:
Post a Comment