Thursday, 18 May 2023

असोरे कुणबीवाडी ग्रामस्थांचा समाजाभिमुख निर्णय -जेष्ठ समाजसेवक शांताराम घडशी यांच्या शुभहस्ते झाले रस्त्याचे उद्घाटन !

असोरे कुणबीवाडी ग्रामस्थांचा समाजाभिमुख निर्णय -जेष्ठ समाजसेवक शांताराम घडशी यांच्या शुभहस्ते झाले रस्त्याचे उद्घाटन !

[ कोकण / गुहागर: उदय दणदणे ]

गुहागर तालुक्यातील निर्मळ ग्रुप ग्रामपंचायत आवरे-असोरे कार्यक्षेत्रातील मौजे.असोरे (कुणबीवाडी) या गावात जिल्हा परिषद रत्नागिरी, बांधकाम विभाग गुहागर यांची जनसुविधा योजना सन-२०२१-२२ अंतर्गत असोरे (कुणबीवाडी) सभागृह ते ग्रामपंचायत कार्यालय येथील कच्च्या रस्त्याचे काम पूर्ण झाले  असल्याने सदर रस्ता वाहतुकीसाठी मुख्य प्रवाहात आला असून तो आबलोली - रत्नागिरी महामार्गाला जोडला गेला असल्याने येथील ग्रामस्थ जनतेची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

          सदर रस्त्याचे उद्घाटन गुहागर तालुका आमदार - भास्करराव जाधव यांच्या शुभहस्ते व्हावे अशी समस्त ग्रामस्थ जनतेची इच्छा होती सदर बाबत आमदार भास्करराव जाधव यांना विनंतीही करण्यात आली होती. परंतु सदर दिवशी त्यांना तातडीच्या कामानिमित्त मुबंई यावे लागल्याने आमदार भास्करराव जाधव यांनी ग्रामस्थांना आपुलकीची सूचना करत माझ्या अनुउपस्थितीत सदर रस्त्याचे उद्घाटन गावातील जेष्ठ नागरिक अथवा कार्यकर्ते यांच्या हस्ते करून घ्यावे, सदर सूचनेचा मान राखत समस्त  असोरे ग्रामस्थांनी सकारात्मक निर्णय घेऊन शुक्रवार दिनांक १२ मे २०२३ रोजी सार्वजनिक श्री सत्यनारायण पूजेचे औचित्य साधत असोरे गावातील आदर्श व्यक्तिमत्त्व, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,सांघिक विकास साधत, स्नेह-प्रेम माणुसकी, जिव्हाळा जपत समाजसेवेची कास धरणारे, "कुणबीवाडी विकास मंडळाचे" संस्थापक व माजी अध्यक्ष, तसेच समाजरत्न पुरस्कार सन्मानित-शांताराम गोपाळ घडशी यांच्या शुभहस्ते सदर रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.

        असोरे ग्रामस्थ जनतेसाठी हा एक ऐतिहासिक असा सुवर्ण क्षण होता. सदर प्रसंगी मंडळाची कार्यकारणी,गावातील जेष्ठ कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...