अल्पसंख्यांक RPI (खरात गट) जळगांव तर्फे कै. इंदिरा बाई पाटनकर शाळेत मुख्यद्यापक व शिक्षाकांचा सत्कार !
जळगाव, अखलाख देशमुख, दि २ : जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात कै इंद्राबाई पाटणकर मराठी शाळेत रमजान ईद मिलन सामाजिक सोहळा साजरा करण्यात आला होता.
शाळेमध्ये सर्व जाती धर्माचे कार्यक्रम साजरे केले जातात तसेच त्यांनी 2023 ची ईद साठी शिक्षक व कर्मचारी यांनी मुस्लिम बांधवांचा रमजान ईद निमित्त सोहळा साजरा करण्याची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक कैलाश तायडे यांनी मांडली होती आणि शाळेने संकल्पनेला स्वीकारून रमजान ईद
चा साजरा सोहळा केला होता.
यावेळेस रिपाई अल्पसंख्यांक जळगांव जिल्हा अध्यक्ष अजीज मुजावर पण या कार्यकर्मात उपस्थित होते.
आजच्या अश्या परिस्थितीमध्ये शाळाने हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे असे विचार पाहून रिपाई अल्पसंख्यांक जळगांव चे जिल्हा अध्यक्ष यांची अशी इच्छा झाली की जळगाव मध्ये पहिल्यांदा मराठी शाळेमध्ये रमजान ईद चा सोहळा साजरा करण्यात आला आणि येणाऱ्या पिढीमध्ये सर्वधर्म एकतेचा संदेश गेला म्हणून शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सत्कार करण्यात यावे असं विचार त्यांनी रिपाई खरात पक्ष पार्टीच्या समोर ठेवला होता म्हणून रिपाई अल्पसंख्यांक खरात (गट) जळगाव जिल्हा तर्फे कै इंद्राबाई पाटणकर मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या 01 मे 2023 रोजी सत्कार करण्यात आला.या कार्यकर्मच्या वेळेस शाळेत रिपाई अल्पसंख्यांक खरात (गट) जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष अजिज मुजावर, अल्पसंख्यांक जळगाव जिल्हा उपाध्यक्ष समीर खलील शहा, रिपाई खरात गट जळगाव जिल्हा अध्यक्ष माननीय जेडी भालेराव, जिल्हा युवा कार्य अध्य्क्ष नदीम काकर, जिल्हा सरचिटनीस परवेश शाह, शाहूनगर शाखा प्रमुख फैज़ान शेख़ आणी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment