वैजापूर नगरपरिषदेत RRR केंद्र स्थापन !
वैजापूर, अकलाख देशमुख, दि १९ : केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने (MoHUA) "मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर" हे अभियान दिनांक १५.०५.२०२३ पासून पुढील ३ आठवड्यांच्या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतला असून या अभियानांतर्गता वैजापूर नगरपरिषद येथे "रिड्यूस, रियुज आणि रिसायकल" सेंटर्स म्हणजेच RRR केंद्रे स्थापन करण्यात आले आहेत.
शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लॅस्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी "रिड्यूस, रियुज आणि रिसायकल" सेंटर्स म्हणजेच RRR सेंटर्स येथे गोळा करावे. जेणेकरून संकलित कलेल्या वस्तू नुतनीकरण,पुनर्वापर किंवा नवीन उत्पादन तयार करण्यात येईल.
No comments:
Post a Comment