सरकारी जमीन खेड चे 1961 पासून चे पुरावे असताना शेतमजुरांना निष्कासन नोटीसा? विरोधात चोपड्या त धरणे आंदोलन !
चोपडा, प्रतिनिधी.. तालुक्यातील कृष्णापुर येथील दहा बोरअजनती येथील तीन नागलवाडी येथील एक अशा चौदा भूमीही न शेतमजूर दलित आदिवासी यांचेसह 104 लोकांनी 1955 सालापूर्वी वनखात्याला मदत केल्याने त्यांनी त्यांना गावालगत कसण्यासाठी दिली त्यात 94 लोकांना त्यांच्या नावे जमिनी करण्यात आल्यात, महसूल खात्याच्या चुकीमुळे दहा लोकांनी लोकांचे नावे जमिनी झाल्या नाहीत.
तशीच तीन प्रकरण बोराजेंटी व नागलवाडी गावातील एक धरून अशी एकूण 14 शेतमजुरांवर अन्याय झालेला आहे परंतु सातबारा व नमुना नंबर आठ या मूळ खात्यांवर त्यांची जमिनीचे नोंद प्रामाणिक पने केली आहे शिवाय त्यांनी महसुल भरल्याच्या पावत्या देखील आहेत असे असताना सुद्धा मुंबई हायकोर्टाच्या 2022 मध्ये झालेल्या निकालाच्या संदर्भ लावून त्यांना निष्कासित करण्याच्या नोटीस जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार मार्फत बजावलेल्या आहे म्हणजे या निकालाचा वरवंटा फिरवण्याचे काम महसूल विभागाने सुरू केले आहे म्हणून निष्काशीत करण्याच्या या नोटिसांच्या निषेध व प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी करून शासनाच्या नियमाप्रमाणे 1978 पूर्वीचे 91 साला पावितोचे अखंड चे प्रकार असल्यामुळे या जमिनीच्या पक्का सातबारा मिळावा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष प्रणित लालबावटा शेतमजूर युनियन व आदिवासीं महासभाचे बॅनरखाली व संघटनेचे नेते कॉम्रेड अमृत महाजन यांचा नेतृत्वात 14 भूमी शेतमजूर दलित आदिवासी परिवारांनी चोपडा तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण केले.
या आमरण उपोषणाच्या वेळी तहसीलदार श्री गावीत याना खरी बाजू मांडून त्याबरोबर कृष्णापूर ग्रामपंचायत दाखला देऊन जमिनी नियमाकुल करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी आपली मागणी शासनाकडे पाठपुरावा करतो आपण केलेल्या युक्तिवादाच्या अभ्यास करतो. अशा तऱ्हेचा आश्वासन श्री गावित यांनी दिलेने उपोषण मागे घेण्यात आले आमरण उपोषणासाठी चोपड्याचे नगरसेवक माजी नगरसेवक काँ सुरेश शिरसाठ, भगवान धनगर आसाराम कोळी यांनी सहकार्य केले. उपोषणार्थि मध्ये सर्वश्री भुऱ्या बारेला ,दयाराम अर्जुन देवरे, नामदेव शिरसाट, आशाबाई पाटील, सुमनबाई कोळी, अंबादास कोळी, श्रावण भिल ,धोंडू सपकाळे, अशोक पाटील, भीमराव कोळी ,आदींचा समावेश होता
No comments:
Post a Comment