Monday, 5 June 2023

बचत गट व अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे चोपडा येथे मोर्चा !!

बचत गट व अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे चोपडा येथे मोर्चा !! 

चोपडा, प्रतिनिधी : चोपडा तालुक्यातील अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन व बचत गट शाखेतर्फे संघटनेतर्फे येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयावर संयुक्त मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे नेतृत्व अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा अध्यक्ष काँ अमृत महाजन व तालुका अध्यक्ष वत्सला पाटील, प्रतिभा पाटील यांनी केले प्रकल्प कार्यालयावर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे तर्फे वरिष्ठ सुपरवायझर श्रीमती रत्ना पाटील, श्रीमती बडगे, श्रीमती शिरसाट, श्रीमती सुप्रिया पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले

निवेदनात सात मागण्या करण्यात आले आहेत त्या अशा__ 

खाऊ पुरवणारे बचत गट यांना बंदी केलेने अंगणवाड्याना योग्य ते साहित्य, गॅस, गॅस ओटा, टाक्या भांडी कुंडी साहित्य  मिळावे..
बचत गटांची थकीत बिले अदा करावी .पूर्ववत बचत गटकडेच खाऊवाटप काम राहू द्यावे...
थकीत मानधन  ध्या एप्रिल २३ पासून मानधन वाढ मिळावी सेवानिवृत्तांना एक रकमी लाभ त्वरित मिळावेत 

अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत निवेदनाच्या प्रती १) आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना २) जिल्हा कार्यपालन अधिकारी ३) एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा परिषद जळगाव जिल्हा जळगाव 

यांना उद्देशून असून म बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी विना विलंब पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे. त्यावेळी  सर्व श्रीमती सुनंदा सपकाळे, मीना गोरख पाटील, उषा पाटील, मिनाबाई विजयाबाई कोळी, ठगोबाई प्रभाकर पाटील, सखुबाई पाटील, मनीषा पाटील, सुमनबाई बाविस्कर, विजया पाटील, निर्जला चौधरी, सुमनबाई कोळी, सुनंदा सोनवणे, शितल पाटील, कविता साळुंखे, शोभाबाई कोळी, संगीता चौधरी, रेखा कोळी, उषाबाई कोळी पाटील, उज्वला चौधरी, सविता पाटील, कुसुम कोळी, कविता पाटील आदींचा समावेश होता.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...