Sunday, 25 June 2023

कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ येथे मोदी @9 अंतर्गत भव्य जाहीर सभा संपन्न !!

कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ येथे मोदी @9 अंतर्गत भव्य जाहीर सभा संपन्न !!

अंबरनाथ, प्रतिनिधी : मोदी @9 अंतर्गत अंबरनाथ शिवमंदिर येथे रविवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नऊ वर्षात केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा मांडला तसेच विरोधकांवर सडकून टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील नऊ वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती देण्यासाठी मोदी @9 अंतर्गत राज्यभरात उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांचे दौरे सभा सुरू झाल्यात. या पार्शवभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ शहरात जाहीर सभा झाली.


यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बनवणार ,कोरोना काळा नंतर आपण जो श्वास घेतोय ते फक्त नरेंद्र मोदींमुळे घेतोय, देश महासत्तेकडे जाताना दिसतोय ते पण मोदींनमुळेच असेही त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदींना समर्थन देण्यासाठी या 9090902024 मोबाईल नंबर वर प्रत्येकाने मिसकॉल द्या. आपल्याला 400 खासदार येत्या लोकसभा निवडणुकीत निवडून आणायचे आहेत असे आवाहन यावेळी रवींद्र चव्हाण यांनी केले.


यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी गेल्या नऊ वर्षात विकासाच्या दृष्टिकोनातून जी प्रगती झाली आहे ती प्रगती सर्व विरोधी पक्षांच्या डोळ्यात खुपते आहे अशी टीका करत भाषणाला सुरुवात केली. पुढे बोलताना मंत्री पाटील यांनी विरोधी पक्षांना देश चालवायचा नाही, संविधान वाचवायचे नाही. हे सर्व चोर, लुटारू, दरोडेखोर एकत्र आले की समजायचं राजा योग्य दिशेने चालला आहे, तसं हे आहे, सगळे एकत्र आले आहेत म्हणजे मोदी योग्य दिशेने चालले आहेत असा टोला विरोधकांना त्यांनी यावेळी लगावला.

यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ,पूर्व मंत्री जगनाथ पाटील, भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले, आमदार किशन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार कुमार आयलानी, मा. आमदार नरेंद्र पवार, कल्याण डोंबिवली भाजपा जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, उल्हासनगर भाजपा जिल्हा अध्यक्ष जमनू पुरुस्वानी, महेश सुखरामानी, युवा नेता अभिजित करंजुले व कल्याण लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी, कार्यकर्ता तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

जेएनपीए चेअरमन यांनी मनिषा जाधव यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे दिले लेखी आश्वासन !!

जेएनपीए चेअरमन यांनी मनिषा जाधव यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे दिले लेखी आश्वासन !! मागणी मान्य झाल्याने ॲड सिद्धार्थ इंगळे यांच...