उपायुक्त अतुल पाटील यांनी केली कल्याण शीळ रोडची पाहणी !
*दंडात्मक कारवाईत केली रक्कम रु. ८३००/-ची वसुली*
कल्याण, नारायण सुरोशी : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील यांनी काल अचानक कल्याण शीळ रोडची पाहणी केली. यावेळी उप मुख्य स्वच्छता अधिकारी ए.एल. घुटे, डोंबिवली विभागाचे उप मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, ४/जे प्रभागाच्या सहा. आयुक्त सविता हिले, ९/आय प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर, स्वच्छता अधिकारी संदिप खिस्मतराव, मोहन दिघे, सुरेश सोळंके, राजेंद्र खैरे उपस्थित होते.
यावेळी पाहणी करताना रस्त्यालगत असलेल्या परिसरात काही ठिकाणी कचरा टाकल्याचे आढळून आल्याने सदर प्रभागक्षेत्रातील कार्यरत २ सफाई कर्मचारी, १ मुकादम, १ स्वच्छता निरीक्षक व २ स्वच्छता अधिकारी यांना याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच सदर ठिकाणी पडलेला कचरा त्वरीत उचलण्याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील यांनी संबंधितांना सुचना दिल्या. तसेच सदर परिसरात उघडयावर कचरा टाकणा-या व्यापारी / नागरीकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात आलेली असून एकूण ११ व्यापारी/नागरीक यांचेकडून एकूण रक्कम रु. ८३००/- इतका दंड वसूल करण्यात आला.
तरी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यापारी/नागरीक यांना आवाहन करण्यात येते की, जे व्यापारी /नागरीक उघडयावर कचरा टाकतांना निर्दशनास येतील अशा व्यापारी /नागरीक यांचे विरुध्द घनकचरा व्यवस्थापन हाताळणी अधिनियम २०१६ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सर्व व्यापारी/नागरीक यांनी आपल्या दुकानात, व्यापाराच्या ठिकाणी, घरात निर्माण होणारा कचरा कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावर टाकू नये व निर्माण होणारा विलगीकृत कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांमध्ये देवून कल्याण डोंबिवली शहर स्वच्छ व सुंदर राखणेकामी महापालिकेस सहकार्य करावे.
No comments:
Post a Comment