यंदाच्या वर्षी कल्याण तालुक्यावर'आपत्ती, कोसळणार?बांधकामे, भराव, नैसर्गिक नाले, महामार्गाची उंची इत्यादी ठरणार कळीचा मुद्दा !
कल्याण, (संजय कांबळे) : यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण हे ९५ टक्के असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मागील ५/६ वर्षाचा अनुभव पाहता यंदा पावसाळ्यात कल्याण तालुक्यावर 'आपत्ती, कोसळणार असे चित्र निर्माण झाले आहे. यांचे कारण म्हणजे नदीच्या काठावर, नदीपात्रात झालेली बांधकामे, पावशेपाडा, कांबा, म्हारळ आदी ठिकाणी केलेले भरमसाठ मातीचे भराव, नैसर्गिक नाल्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे गायब झालेले नाले आणि या सर्वात महत्त्वाचे म्हणजे म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान सुरू असलेला महामार्ग व त्यांची उंची हे कळीचा मुद्दा ठरणार आहेत.
कल्याण तालुक्यात बारवी, उल्हास, भातसा आणि काळू या नद्या आहेत. मागील काही वर्षाचा अनुभव विचारात घेतला तर म्हारळ, वरप, कांबा, मोरयानगर, रायते, पावशेपाडा, मानिवली, मोहिली, आंबिवली, खडवली, ज्यू, आदी गावाना मोठा फटका बसला होता. पावशेपाडा,मोरयानगर, वरप, म्हारळ आपटी खडवली येथे जिवीत व वित्त हानी झाली होती. म्हारळ येथे घराचा स्लँब कोसळून एका महिलेचा जीव गेला होता तर तिच्या मुलीला डोळा गमवावा लागला होता. पाचवामैल येथे घराच्या भिंती कोसळल्या होत्या,कल्याण मुरबाड महामार्गावरील उल्हास नदीवरील रायते पुल वाहून गेला होता. भातसा नदीवरचा खडवली पुलाचे अनेक भाग वाहून गेले होते. अनेकांची जनावरे, शेळ्या मेंड्या, कोंबड्या मेल्या होत्या, कित्येक दिवस घरात पाणी साचल्याने संसार उध्वस्त झाले होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन पुरेसे पडले नव्हते.
सध्याची परिस्थिती खूपच उलटी व भयावह आहे, उल्हास नदीचा विचार केला तर बारवी डँमच्या पासून ते मोहने बंधाऱ्यापर्यत नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. दिवसेंदिवस नदीचे पात्र कमी होत आहे.त्यामुळे पाणी नदीपात्रा बाहेर येणार हे सांगायला कोण्या जोतिषाची गरज नाही.पावशेपाडा येथे सेंच्युरी रेआँन कंपनीच्या बिट्स स्कूल आँफ मँनेजमेन्ट ने हजोरो ब्रास भराव केला आहे.कांबा, म्हारळ, वरप येथे ही भराव झाला. म्हारळ, खडवली, वरप, कांबा, इत्यादी ग्रामपंचायत हद्दीतील नैसर्गिक नाले गायब झाले असून हे पाणी कोठे जाणार?
हे कमी की काय म्हणून आता म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान सुरू असलेला महामार्ग रस्ता, त्याची जागोजागी कमी अधिक उंची, टाकलेले पाईप, बाजूंनी तयार केलेले गटार, यामुळे पाणी जास्त भरणार आहे.रायते, मानिवली, आपटी मांजर्ली, पिंपळोली आदी गावातून जाणारा मुंबई वडोदरा एक्स्प्रेस यात भरच घालणार आहे.
याशिवाय तालुक्यात अनेक शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मोडकळीस आले आहेत. भिंती चिरलेल्या आहेत काही गावातील घरे कोसळण्याच्या स्थितीत आहेत.झाडे, विजेचे खांब पडण्याच्या मार्गावर आहेत. असे असताना महसूल विभाग मात्र आपत्ती व्यवस्थापन समिती च्या बैठका घेतल्या असल्याचे सांगून खांदे उडवून मोकळे होत आहेत.त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीवरच "आपत्ती, कोसळणार नाही ना याची काळजी घ्यावी.
No comments:
Post a Comment