Thursday, 22 June 2023

वसईत उद्या खासदार आपल्या दारी उपक्रम !!

वसईत उद्या खासदार आपल्या दारी उपक्रम !!



वसई, प्रतिनिधी : वसई-विरार शहर आणि ग्रामीण परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्वरित समस्येचे निराकरण करण्यासाठी शुक्रवारी (ता. २३) खासदार आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

वसई पश्चिममधील आनंद नगर येथील विश्वकर्मा सभागृहात खासदार राजेंद्र गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० वाजता हा उपक्रम सुरू होणार आहे. या वेळी धर्मादाय आयुक्त, प्रांत अधिकारी, तहसीलदार, आयुक्त वीज विभाग कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस उपआयुक्त, तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार गावित यांनी दिली.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...