Thursday, 22 June 2023

महापालिकेच्या RRR सेटर्संना चांगला प्रतिसाद !

महापालिकेच्या RRR सेटर्संना चांगला प्रतिसाद !

*महापालिकेच्या १० RRR सेंटर्सवर ३२७७.८९ किलोंचे सामान संकलित*

कल्याण, नारायण सुरोशी :  केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने दि. १५ मे २०२३ ते दि. ५ जून २०२३ या कालावधीत "मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर" हे अभियान राबविले होते. या अभियाना अंतर्गत १० RRR (Reduce, Reuse, Recycle) सेंटर्स १० प्रभागात उभारण्यात आली होती. या RRR सेंटर्समध्ये आज पर्यंत ३२७७.८९ किलो वजनाचे सुमारे ३ टनापेक्षा जास्त म्हणजे १८३५ नग (सामान) संकलित झाले असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आज दिली. महापालिकेने स्थापित केलेल्या RRR सेंटर्संमधील संकलित वस्तु व साहित्य एनजीओ मार्फत गरजुंना वाटप करण्याचा कार्यक्रम महापालिकेच्या २/ब प्रभागात आज आयोजिलेला होता,सदर कार्यक्रमात बोलताना आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी ही माहिती दिली.

 हे संकलीत झालेले सामान म्हणजे महापालिकेस मिळालेला खूप चांगला प्रतिसाद आहे. यामध्ये वापरण्यायोग्य कपडे, शुज, वह्या-पुस्तके, दफ्तरे, चांगल्या प्रतीच्या साड्या इ. सामान संकलित झाले आहे. त्याचा वापर गरजु लोकांना होवू शकतो, RRR केंद्राला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आता कल्याणला १ आणि डोंबिवलीला १ अशी २ RRR सेंटर्स कायम स्वरुपी सुरु ठेवणार आहोत, जेणेकरुन गरजु लोकांना वापरण्यायोग्य वस्तुंचे संकलन येथे करता येईल अशी माहिती देखील महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी दिली. हे संकलित झालेले सामान रुपिंदर कौर यांच्या सोलास इंडिया या एनजीओमार्फत आदिवासी भागातील गरजु व गरीब व्यक्तींना वितरित केले जाणार आहे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...