Thursday, 22 June 2023

कृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा घ्या लाभ !!

कृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा घ्या लाभ !!

महाराष्ट्र शासन शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण वर्ग यांना केंद्र बिंदू  मानून अनेक योजना राबवित असते. या योजना लोकांपर्यंत पोहचवून त्यांना त्याचा लाभ मिळून देण्यासाठी राज्य शासनाने शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला आहे. या अभियानाअंतर्गत आज आपण जाणून घेऊ शेतकऱ्यांसाठी असलेली कृषि यांत्रिकीकरण अभियानाची माहिती.

उद्देश ___

१. शेतकऱ्यांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे. 

२. विभागनिहाय पिक रचनेनुसार आवश्यक असलेली व पूर्वतपासणी केलेली दर्जेदार कृषि औजारे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देणे. 

३. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुरूप व मागणीप्रमाणे कृषि यंत्रसामुग्री / औजारे उत्पादने अनुदानावर उपलब्ध करून देणे. 

४. कृषि उत्पादन प्रकियेत अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे.

लाभ घेण्यास पात्रताधारक ___ 

१. सदर योजना ऑनलाईन असल्याने लाभार्थ्यांनी www.mahadbt.maharashtra.gov.in या  संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. 

२. लाभार्थ्याच्या नावे ७/१२ , ८-अ व स्वतःच्या नावे जातीचा दाखला असणे आवश्यक. 

३. लाभार्थ्याने खरेदी करावयाची औजारे केंद्रीय तपासणी संस्था किंवा केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या संस्थाकडील टेस्ट रिपोर्ट असणे बंधनकारक असून त्यांनाच अनुदान अनुज्ञेय राहील.

योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बाबी ___ 

ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्र व औजारे, ट्रॅक्टर व पॉवर टिलर चलित यंत्र व औजारे, पिक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित औजारे, प्रक्रिया युनिट्स, भाडे तत्वावर कृषि यंत्र व औजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी (औजारे बँक) इत्यादी.

समाविष्ट यंत्रे / औजारे : १. ट्रॅक्टर, २. पॉवर टिलर, ३. रिजर, ४. रोटाव्हेटर इत्यादी 

अनुदान : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक व महिला शेतकरी यांना मापदंडाच्या ५० टक्के व इतर लाभार्थीसाठी ४० टक्के अनुदान देय आहे. 

राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे तंत्र आत्मसात करून आर्थिक प्रगती साधावी. या योजनेच्या माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयात संपर्क करावा.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...