Friday, 23 June 2023

गप्पा मनातल्या मनात (१) :-

गप्पा मनातल्या मनात  (१) :-

नुकताच योगा डे होऊन गेला म्हणे ?
पण खरंच योगा म्हणजे काय ?
थांब जरा मनाच्या गहनतळात शोधून बघतो.

योग: कर्मसु कौशलम् ___

योग म्हणजे कृती मधलं कौशल्य. कोणत्याही कृतीमध्ये कौशल्य प्राप्त करून घेणं  म्हणजे योग. असं म्हणतात. 
म्हणजे पहिल्यांदा आपल्याला उच्चार कौशल्य जाणून घ्यायचं असेल तर योग्य उच्चार करायला शिकलं पाहिजे. म्हणजेच 
योगा नव्हे योग. 

परदेशी लोकांना शुद्ध उच्चार करता येत नाहीत म्हणून ते योग ला योगा म्हणतात. तसे ते लोक सुद्धा त्यांच्या भाषेतील आपल्या उच्चारांना हसत असतीलच ना !   पण आपण तरी योगा न म्हणतात योग म्हणूया. 

तर मी म्हणत होतो (योग: कर्मसु कौशलम्) ___

कामामध्ये कौशल्य प्राप्त करून घेणे. तसे योगाचे अनेक प्रकार आहेत म्हणे.  पण विवेकानंदानी सांगितलेले राजयोग, ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग. हे चार प्रकार. आपण त्यातल्या कर्मयोगाचे पालन मुख्यतः करत असतो म्हणून पहिल्यांदा कर्मयोगा बद्दल मनात काही सापडते का बघूया. 
कर्मयोग म्हणजे ज्या गोष्टी व्यवहारासाठी आवश्यक, जगण्यासाठी आवश्यक आणि ज्या कराव्याच लागतात त्यांना आपण कर्मयोग म्हणूया.

आपल्या प्रत्येक कृतीत कौशल्यपूर्ण पूर्णता आणणे यासाठी सतत प्रयत्नशील राहणे म्हणजे योगाभ्यास योग म्हणजे कौशल्यपूर्णता ___

आधुनिक भाषेत 'टी क्यू एम'= टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. कॉर्पोरेट जगतात लाखो रुपये घेऊन शिकवतात ते बहुधा हेच असावे. ते शिकवताना कायझन, टी पी एम, हाउसकीपिंग वगैरे बरंच काही शिकवलं जातं हाउसकीपिंग चा जरी विचार केला तरी घरात वस्तू जिथल्या तिथं असणं स्वच्छता आणि व्यवस्थितपणा हेच तर शिकवतात. त्याला 5S असंही म्हणतात.

एका ठिकाणी एक छान बोर्ड पाहिला

'कोणतीही वस्तू जिथल्या तिथं, जशीच्या तशी आणि जेव्हाची तेव्हा मिळणं म्हणजेच शिस्त' हे वाक्य तयार करणाऱ्याचं फार कौतुक करावं वाटतं. यात हाउसकीपिंग, टीपीएम, कायझन, क्वालिटी मॅनेजमेंट सगळ्याचं सार या एका वाक्यात त्याने गुंफलं होतं. वाक्य कुणाचं माहीत नाही पण एका कंपनीत तो बोर्ड पाहिला. हेच ते 'कर्मसु कौशलम्'. मग ते कंपनीत असो, ऑफिसमध्ये असो, दुकानात किंवा घरात असो, शाळा-कॉलेजमध्ये असो सगळीकडे हेच तत्व लागू पडतं.

चला तर मग आजपासून निदान एवढं तरी व्यवहारात, अमलात आणायचा प्रयत्न करूया. आपल्या घरात ऑफिसमध्ये कंपनीत सगळीकडे बोर्ड लावूया पण प्रथम आपल्या मनात बोर्ड लावूया 

"कोणतीही वस्तू जिथल्या तिथं, जशीच्या तशी आणि जेव्हाची तेव्हा मिळणे म्हणजे शिस्त !"

आज मनाच्या गहन तळात एवढंच सापडलं. बघू पुन्हा काय सापडतंय पुन्हा एखादी खोल बुडी मारू तेंव्हा उद्या परवा…..

………. सुनील देशपांडे ९६५७७०९६४०

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...