Friday, 23 June 2023

कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकां-याची अचानक गाव व शाळा भेटी, म्हसकळ येथील शाळा बंद काही' गुरुजीं लेट ?

कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकां-याची अचानक गाव व शाळा भेटी, म्हसकळ येथील शाळा बंद काही' गुरुजीं लेट ?

कल्याण, (संजय कांबळे) : पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी आज सकाळी अचानक म्हारळ, गोवेली, घोटसई, आणि म्हसकळ आदी ठिकाणी भेटी दिल्या, यावेळी म्हसकळ जिप शाळा बंद आडळून आली तर इतर ठिकाणी गुरुजी लेट आल्याने काही गुरुजींची शाब्दिक 'शाळा घेतली तर काहींची शिक्षेसाठी तरतूद करून ठेवली. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी हे कर्तव्यनिष्ठ गटविकास अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेत परिचित आहेत, कर्तव्यात कसुर करणाऱ्याना ते अजिबात सोडत नाहीत, तसेच चांगले काम करणाऱ्या कर्मचारी व अधिका-यांच्या पाठीवर कौतुकाची शाब्बासकी द्यायला विसरत नाहीत, आतापर्यंत अनेक ग्रामसेवक, कर्मचारी, विस्तार अधिकारी आदीवर त्यांनी कारवाई प्रस्तावित केली आहे. कित्येक ग्रामसेवक निलंबित झाले आहेत. त्यामुळे त्यांचा पंचायत समितीवर जबरदस्त वचक, नियंत्रण, राहिले आहे. पंचायत समितीच्या सर्व विभागावर त्यांचे बारीक लक्ष असते.

मागील काही महिन्यांपूर्वी त्यांनी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती व शाळां आरोग्य केंद्र, आदींना अचानक भेटी दिल्या होत्या.यावेळी लेट येणाऱ्या शिक्षकबरोबर सेल्फी काढल्या होत्या, तर आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते.

आज पुन्हा अचानक, म्हारळ, गोवेली, घोटसई आणि म्हसकळ येथे भेटी दिल्या. यावेळी जिल्हा परिषद शाळा म्हसकळ ही बंद आढळून आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांबरोबर फोटो काढला. तर गोवेली, घोटसई येथील गुरुजींची शिकवणी व उजळणी गटविकास अधिका-यांनी घेतली. ही वार्ता वा-यासारखी सर्वत्र पसरली. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली. अगोदर जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळाचा विषय तालुक्यात चांगलाच गाजतो आहे, तसे तालुक्यातील अनाधिकृत शाळा, त्यांना नोटिसा देणे, कारवाई करणे याविषयी उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे. अशात आता दस्तुरखुद्द गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनीच भेट दिली असता शाळा बंद आढळून येणे, हे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार नव्हे काय? त्यांचे केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी शाळा भेटी देतात तेव्हा नक्की काय तपासतात?काय सूचना देतात? शिक्षणाधिकारी यांचे शिक्षक व शिक्षण विभागावर नियंत्रण आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहे.आता पावसाळा सुरू होत आहे, सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, सरपंच, सदस्य  आदींनी आपल्या परिसरात पुरामुळे अथवा इतर नैसर्गिक आपत्ती मुळे जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...