Friday, 23 June 2023

समृद्धीच्या ब्लास्टिंगमुळे शेरे गावातील किशोर पंडित यांच्या शौचालयाचा काही भाग कोसळला, कर्मचाऱ्यांच्या समोरच प्रकार, प्रशासन गप्प ?

समृद्धीच्या ब्लास्टिंगमुळे शेरे गावातील किशोर पंडित यांच्या शौचालयाचा काही भाग कोसळला, कर्मचाऱ्यांच्या समोरच प्रकार, प्रशासन गप्प ?

कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या अनेक महिन्यापासून मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या ब्लास्टिंगच्या दणक्यामूळे शहापूर तालुक्यातील शेरे गावातील आदिवासी वस्ती व बौध्दवाडा येथील लोकांच्या घरांना, शौचालये ,समाजहाँल,च्या भिंतीला तडे गेले आहेत, त्या चिरलेल्या आहेत, त्यांना भेगा पडलेल्या आहेत, त्या कोसळण्याच्या स्थितीत आहेत .अशा बातम्या पत्रकार संजय कांबळे यांनी वारंवार छापल्या .अखेरीस आज सकाळी केलेल्या ब्लास्टिंग मुळे बौध्दवाड्यातील किशोर मंगल पंडित यांच्या शौचालयाचा काही भाग कोसळला, विशेष म्हणजे यावेळी समृद्धी महामार्गावरील 'सुरी, नामक प्रमुख कामगार हे ग्रामपंचायत सदस्य सविता पंडित यांच्या घरात बसले होते. त्यांनी प्रत्यक्ष ब्लास्टिंग चा दणका अनुभवला, व शौचालयांची पाहणी केली. ऐवढा भयानक प्रकारानंतर ही प्रशासन मात्र मुगगिळून गप्प आहे, त्यामुळे ते कोणाच्या 'मृत्यू,ची वाट पहात आहेत का?असा सवाल पंडित यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे अनेकांची समृद्धी झाली असली तरी, या महामार्गाच्या आजूबाजूच्या गावाची व तेथील ग्रामस्थांची पुरती बरबादी होत आहे.शहापूर तालुक्यातील शेरे हे गाव समृद्धी महामार्गाच्या जवळ वसलेले आहे. गावातील आदीवांशीवाडी व बौध्दवाडा हे या महामार्गापासून काही मिटर अंतरावर वसलेले आहे. त्यामुळे ब्लास्टिंग चा सर्वाधिक फटका याच लोकांना बसत आहे वाडीतील अनेकांच्या घराना.हादरे बसून भिती, चिरलेले आहे, ब-याचवेळी मोठमोठे दगड घरावर येवून पडलेले आहेत, सुदैवाने अद्याप यात कोणाचाही जीव गेलेला नाही. आदिवासी व बौध्दवाड्यातील लोकांचे ही व्यथा, प्रश्न, अडचणी, समस्या, पत्रकार संजय कांबळे हे गेल्या कित्येक महिन्यापासून विविध वृत्तपत्रातून मांडत आहेत.
येथे आतापर्यंत समृद्धीचे अधिकारी, नायबतहसीलदार, पोलीस प्रशासन आदी अधिकारी कर्मचारी येवून गेले. मात्र या लोकांचे प्रश्न काय सुटले नाहीत. कालच या ब्लास्टिंग च्या दणक्यामुळे येथील लोकांची घरे, शौचालये कोसळण्याच्या स्थितीत असे वृत्त छापले होते. यामध्ये येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत असा उल्लेख केला होता. तोपर्यंत आज सकाळी अकरा च्या आसपास पुन्हा जबरदस्त ब्लास्टिंग केला, यामुळे अगोदरच चिरलेल्या किशोर पंडित यांच्या शौचालयाचा काही भाग कोसळला.

विशेष म्हणजे या ब्लास्टिंग ची तीव्रता किती आहे हे बघण्यासाठी समृद्धी महामार्गावरील 'सुरी,नामक अधिकारी ग्रामपंचायत सदस्य सविता पंडित यांच्या घरी बसले होते. ब्लास्टिंग च्या दणक्यामुळे तेही काही काळ गोंधळून गेले. व त्यांनी मान्य केले की खरेच येथील ग्रामस्थांना धोका आहे.शौचालयाच्या पडलेल्या भिंतीची पाहणी करून वरीष्ठांना कळवतो असे बोलून ते निघून गेले. त्यामुळे पावसाळा सुरू होत आहे, आता प्रशासनाने अधिक अंत पाहू नये, येथील लोकांशी बोलून त्यांना योग्य मोबदला देऊन किंवा त्यांच्या सुरक्षितेची हमी देऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढावा, अन्यथा यात जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व यातून ग्रामस्थांचा उद्रेक होऊ शकतो, याचे भान ठेवावे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...