Friday, 23 June 2023

कल्याण येथे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने वडिलांचे छत्र हरविलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

कल्याण येथे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने वडिलांचे छत्र हरविलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

*निलेश सांबरे आणि मोनिका पालवे यांच्या हस्ते २५ लाख वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ*

कल्याण, प्रतिनिधी : भिवंडी लोकसभा अध्यक्षा मोनिका पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने वडिलांचे छत्र हरविलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कोरोना काळात अनेक माता भगिनींचे संसार उध्वस्त झाले होते. अनेक माता भगिनींनी आपल्या घरातील कर्त्या पुरुषाला गमावले होते. विधवा माता भगिनींना घर संसार चालविणे अतिशय कठीण झाले होते. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांचे छत्र गमावले होते.

त्यामुळेच निलेश भगवान सांबरे यांच्या संकल्पनेतून व ठाणे जिल्हा उपक्रम प्रमुख अजित जाधव यांच्या सहकार्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वडिलांचे छत्र हरविलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत पुरविण्याचा संकल्प करण्यात आला होता या संकल्पची पूर्तता गुरुवारी 
पारनाका कल्याण येथील अभिनव विद्यामंदिर या शाळेत जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे आणि भिवंडी लोकसभा अध्यक्षा मोनिका पानवे यांच्या हस्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वडिलांचे छत्र हरविलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये  शस्कूल बॅग, वह्या, पेन्सिल, शार्पनर रबर स्केल पट्टी विद्यार्थ्यांना देण्यात आले. 

उपस्थित गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून दरवर्षीप्रमाणे २५ लाख वह्या वाटप कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ निलेश सांबरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी विधवा माता भगिनि महिलांना मार्गदर्शन करताना माता भगिनींनो जोपर्यंत तुमचा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही शिक्षण व आरोग्याची कोणत्याही प्रकारची समस्या असो तुम्ही थेट जिजाऊ संस्थेची संपर्क करा हा भाऊ तुमच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहील असे निलेश सांबरे म्हणाले. 

उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बाळांनो तुमचा हा मामा तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमच्या सोबत खंबीरपणे उभा राहील. तुमचा शिक्षणात कोठेही खंड पडू दिला जाणार नाही असे वचन दिले.

असे बोलताच उपस्थित महिलांचे डोळे पाणावले होते.
भिवंडी लोकसभा अध्यक्षा मोनिका पानवे म्हणाल्या महिलांनी आता घाबरू नये जिजाऊ संस्था तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे तुम्ही एकत्रित येऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे कोणतातरी व्यवसाय केला पाहिजे तुम्हाला आवश्यक असलेली सर्व मदत जिजाऊ संस्था करेल असे आश्वासन मोनिका पानवे यांनी दिले.

जिजाऊ संस्थेची धडाडती तोफ ज्येष्ठ पत्रकार कैलास म्हापदी यांनी महिलांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. यावेळी जिजाऊ संस्थेचे ठाणे जिल्हा उपक्रम प्रमुख अजित जाधव जिजाऊ संस्था टिटवाळा शाखेचे अध्यक्ष संदीप तरे बल्याणी शाखा अध्यक्ष नजीफ रईस, सामाजिक कार्यकर्ते सुनील उतेकर, भारत श्री सूर्यकांत जाधव, कुणबी समाज कल्याण शहराध्यक्ष बबन देसले, कल्याण शहर कुणबी समाज सचिव एकनाथ ठाणगे
 लाभ फाउंडेशन अध्यक्ष फर्नांडिस मॅडम, दिलीप कपोते फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना कपोते, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कल्याण अध्यक्षा प्रिया शर्मा, कल्याण नागरिक संपादक मच्छिंद्र कांबळे, खाटीक समाज अध्यक्ष क्षीरसागर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार भरत दळवी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जिजाऊ संस्थेचे सदस्य संदीप शेंडगे, साहिल मगर, रुपेश पाटील, कल्पना पायाळ, अश्विनी झगडे, वैभव पवार  यास्मिन मॅडम यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...