Friday, 23 June 2023

कलगी तुरा समाज उन्नती मंडळ - मुबंई वतीने "५५ वी" वार्षिक सर्वसाधारण सभेचे मुबंईत आयोजन !

कलगी तुरा समाज उन्नती मंडळ - मुबंई वतीने "५५ वी" वार्षिक सर्वसाधारण सभेचे मुबंईत आयोजन !

मुंबई,  उदय दणदणे :

       कलगी तुरा समाज उन्नती मंडळ (मुबंई) ह्या संस्थेची "५५ वी" वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक.२५ जून २०२३ रोजी दुपारी.०३ वा.३० मी. कुणबी समाजोन्नती संघ, वाघे हॉल, सेंट झेवीयर स्ट्रीट, परेल (पूर्व) मुबंई-४००१२ येथे आयोजित करण्यात आली असल्याचे "कलगी तुरा समाज उन्नती मंडळ"-मुबंई, ह्या संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे. 

दि.१७ जुलै २०२२ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन करणे व मंजुरी देणे तसेच आर्थिक वर्ष २०२२-२३ अखेरचा व्यवस्थापक व कार्यकारणी समितीने सादर केलेल्या संस्थेचा कामकाजाचाअहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्र स्वीकारून त्यास मान्यता देणे असे सभेपुढील महत्वपूर्ण विषय असणार आहेत. सदर सभेला चिठ्ठी मालक यांना हजर राहता आले नाहीतर सदर सभेस आपला प्रतिनिधी पाठवावा त्याचबरोबर ज्या शाहीर अथवा कलाकारांना पुरस्कार मिळाले असतील त्यांनी कृपया सदरबाबत पुरावे मंडळाकडे पाठवून सहकार्य करावे असे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे. तरी सदर आयोजित सभेस सर्व चिठ्ठी मालक, सभासद  यांनी वेळेत उपस्थित राहून संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन कलगी तुरा समाज उन्नती मंडळ (मुबंई) वतीने सचिव संतोष धारशे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...