जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व शिवसेना आयोजित नालासोपारा येथे दोन दिवसीय आधार कार्ड शिबीर संपन्न 200 नागरीकांनी घेतला लाभ ..
वसई, प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती संदेश ढोणे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच शिवसेना ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य दोन दिवसीय आधार कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
आधार कार्ड शिबीराअंतर्गत आधार कार्ड पॅन कार्ड शी लिंक करणे, नविन आधार कार्ड, आधार कार्ड दुरूस्ती, मोबाईल नंबर लिंक करणे, बायोमेट्रिक करणे इत्यादी सेवा देण्यात आले.
या उपक्रमास नागरीकांचा उत्सुर्फ प्रतिसाद मिळाला.
यावेळी आधार कार्ड शिबीराचे उध्दघाटन महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख हर्षालीताई खानविलकर, शहर प्रमुख समीर गोलांबडे, उपशहरप्रमुख महेश निकम, विभाग प्रमुख दानिश करारी व स्थानिक जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी नागरीक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment