Saturday, 24 June 2023

सख्ख्या बहिणीने व मेव्हण्याने फसविल्याने भावाची खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार !!

सख्ख्या बहिणीने व मेव्हण्याने फसविल्याने भावाची खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार !!

*भावाची 30 लाख रुपयाची केली फसवणूक*

कल्याण, प्रतिनिधी : घाटकोपर येथे राहत असलेल्या सख्या बहिणीने व मेहुण्याने फसविल्याने भाऊ रवींद्र गव्हाळे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून मेव्हणे व बहिणीला अटक करण्याची मागणी केली आहे.

घाटकोपर येथे वास्तव्यास असलेले मेव्हणे बापूसाहेब सोनवणे व बहीण सुनिता सोनवणे यांनी कल्याण येथे राहत असलेल्या आपल्या रवींद्र ज्ञानदेव गव्हाळे या सख्ख्या भावाची 30 लाख रुपयाची फसवणूक केली आहे.

कोरोना काळात शेअर बाजारात शेरखान या सब ब्रोकर वरून शेअर बाजारात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यासाठी बहिणीने आपला सख्खा भाऊ रवींद्र ज्ञानदेव गव्हाळे यांच्याकडे पैशासाठी विनवणी केली. जवळजवळ 30 लाख रुपयांचा तोटा बापूसाहेब राजगुरू यांना झाला होता. रवींद्र गव्हाळे यांच्याकडे तात्काळ इतकी मोठी रक्कम म्हणजेच तीस लाख रुपये नव्हते त्यांनी आपल्या बहिणीला माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले. परंतु बहिणीने भावाकडे सातत्याने पैशाची मागणी केली तुम्ही जर या कठीण काळातमदत नाही केली तर माझा नवरा बापूसाहेब सोनवणे हा आत्महत्या करील आणि माझा संसार उघड्यावर पडेल तुम्ही काहीही करा पन मला पैसे द्या अशी विनवणी बहीण सुजाता हिने भाऊ रवींद्र याला करत होती.

बहिणीची दया आल्याने भावाने एचडीएफसी बँकेतून आपल्या राहते घर गहाण ठेवून फ्लॅटवर 15 लाख रुपये कर्ज काढून
बहिण सुजाता व मेहुणे बापूसाहेब यांना गुंतवणूकदारांना पैसे देण्यासाठी आपल्या बँक खात्यातून वेळोवेळी देत गेले. काही दिवस उलटल्यानंतर बहीण सुजाता व मेव्हणे बापूसाहेब हे कल्याण येथील माझ्या घरी राहावयास आले.

गुंतवणूकदार कल्याण ला माझ्या घरी येऊ लागले बहिणीने पुन्हा माझ्याकडे पैशाची मागणी केली मी क्रेडिट कार्ड वरून कर्ज काढून व बहिणीला पुन्हा पैसे दिले असे करत मी 30 ते 35 लाख रुपये आत्तापर्यंत दिले आहेत. 

माझी मोठी आर्थिक फसवणूक झाली असून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु आरोपी सुनीता सोनवणे व बापूसाहेब सोनवणे यांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. मी माझा फ्लॅट गहाण ठेवून फ्लॅटवर कर्ज काढून पैसे दिल्याने बँकेचे रिकव्हरी एजंट माझ्या घरी पैशासाठी तगादा लावत आहेत. मी प्रचंड मानसिक तणावात आहे. याच तणावामुळे मला हृदयाचा त्रास देखील सुरू आहे.

मी मोठ्या आर्थिक अडचणीत असून सुनिता सोनवणे व बापूसाहेब सोनवणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून माझे पैसे मला मिळवून देण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे अन्यथा माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे रवींद्र ज्ञानदेव गव्हाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

त्यामुळे खडकपाडा पोलीस आरोपी सुनीता सोनवणे व बापूसाहेब सोनवणे यांना कधी अटक करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...