रायगड जिल्हापरिषद प्राथमिक मराठी शाळा (साले) झाली डिजिटल !!
कोकण, (शांताराम गुडेकर / दिपक मांडवकर) :
महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून रायगड जिल्ह्यातील जिल्हापरिषद प्राथमिक मराठी शाळा (साले) ही सर्वांच्या सहकार्याने डिजिटल करण्यासाठी मोठे योगदान मिळाले. शाळेचे कलर काम आणि डिजिटल पैंटिंग पुर्ण केल्याबद्दल आभार प्रदर्शन चा कार्यक्रम ठेवण्यात आला.कार्यक्रमासाठी शाळेचे केंद्र प्रमुख म्हात्रे सर, मुख्याध्यापिका धुमाळ मॅडम, सहाय्यक शिक्षिका बागुल मॅडम, लाडगरे, झेप प्रतिष्ठान कडून श्री.योगेश खाकम सर, संदीप गोळे, पंकज सिं ,तसेच कार्यक्रमासाठी टाटा रुग्णालय मुंबई येथे कार्यरत असलेले समाजसेवक श्री.सत्यजित भोनकर तसेच गावातील आर्थिक साहाय्य करणारे सहकारी मित्र साले ग्रामपंचायत सदस्य शरद भोनकर, गावातील प्रतिष्ठित युवक सुभाष भोनकर, नागेश भोनकर, तुकाराम भोनकर, कुमार सौरव सांगळे रघुनाथ भोनकर, कुमार अक्षय जाधव, शाळेचे चित्रकार रुपेश म्हस्के, शाळा समिती अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ, महिला, युवक आणि पालक उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात सरस्वती मातेचे पूजन करून आणि श्री गणेशाला श्रीफळ देऊन करण्यात आले. तर शाळेतील छोट्या मुलींनी स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले.शाळेतील सौ. बागुल मॅडम यांनी प्रास्ताविक सादर केली. तसेच सर्व उपस्थित मान्यवर यांचे श्रीफळ,शाल आणि गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले..
कार्यक्रममध्ये कलर काम आणि विद्यार्थी यांना शैक्षणिक मदत केल्याबद्दल (झेप प्रतिष्ठानला) शाळेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आपल्या सर्व देणगीदार, मदतगार, आर्थिक सहाय्य करणाऱ्या सर्व मित्र मंडळी, सहकारी यांचे सुद्धा शाळेच्या वतीने आभार माणण्यात आले. झेप प्रतिष्ठानच्या वतीने मुलांना शाळेच्या बॅग आणि शाळेउपयोगी साहित्य देण्यात आले.श्री.संदीप गोळे सर यांनी आपलें मनोगत व्यक्त केले तसेच सत्यजित भोनकर सर, सुभाष दादा भोनकर, केंद्र प्रमुख म्हात्रे सर यांनी आपलें मनोगत व्यक्त केले. श्री.सत्यजित भोनकर यांनी भाषणातून शाळेला मदत करणारे सर्व मदतगार, आपलें सर्व तरुण सहकारी, झेप प्रतिष्ठान आणि शाळा कमिटी, मुख्याध्यापक, सहाय्य शिक्षिका सर्वांचे मनापासून आभार मानले. तसेच मुख्याध्यापिका सौ.धुमाळ मॅडम यांनी देखील सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
No comments:
Post a Comment