Sunday, 18 June 2023

शहापूर तालुक्यातील शेरे गावातील घरे कोसळण्याच्या स्थितीत, समृद्धी महामार्गाच्या ब्लास्टिंगचा दणका, ग्रामस्थ आक्रमक !

शहापूर तालुक्यातील शेरे गावातील घरे कोसळण्याच्या स्थितीत, समृद्धी महामार्गाच्या ब्लास्टिंगचा दणका, ग्रामस्थ आक्रमक !

कल्याण, (संजय कांबळे) : राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा महत्वकांक्षी मानला जाणारा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर केल्या जाणाऱ्या भंयकर ब्लास्टिंग मुळे शहापूर तालुक्यातील शेरेगावातील बौध्दवाडा व आदिवासी वाडीतील घरे,शौचालय, कोसळण्याच्या स्थितीत असून यामुळे येथील ग्रामस्थ भयानक संतापले असून आम्हाला उध्वस्त करूनतुम्हाला'कोणाची'समृद्धी,साधायची आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग राज्यातील अनेक जिल्ह्यातून, तालुक्यातून जातो, यासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन केले आहे, ऐवढेच नव्हे तर अख्खी जंगले नष्ट केली आहेत, हे काम अंतिम टप्प्यात आले तरीही अद्यापही तोडलेल्या झाडाच्या ठिकाणी दुसरी झाडे लावली नाहीत. हे झाले निसर्गाच्या बाबतीत, तर शहापूर तालुक्यातील शेरे गावातून हा मार्ग बौध्दवाडा व आदिवासी वस्ती पासून काही मीटरच्या अंतरावरून जातो, येथे मोठा डोंगर असल्याने तो फोडण्यासाठी अधिक तीव्रतेचा ब्लास्टिंग करावा लागतो. यामुळे येथील लोकांची घरे, शौचालय, पाण्याच्या टाक्या, यांना भेगा पडलेल्या आहेत, रमेश जाधव, किशोर पंडित, विजय पंडित, शेरे ग्रामपंचायत सदस्य सविता पंडित, आदीच्या घराची, शौचालय ची स्थिती खूपच बिकट झाली. या ग्रामस्थांनी वांरवार समृद्धी चे अधिकारी, कर्मचारी, शहापूर तहसीलदार, यांना निवेदन, तक्रारी, दिले, मात्र, पाहणी, करतो, बघतो, या पलिकडे काही झाले नाही.

मध्यतंरी काही लोकांना मदतीचे' गाजर, देण्यात आले परंतु यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घोळ घालून ठेवला. ज्यांचे खरेच नुकसान झाले आहे ते राहिले बाजूला व भलत्याच हितसंबंधांतील "लाभार्थ्यांची समृद्धी" झाली. त्यामुळे पुन्हा ग्रामस्थांमध्ये संताप पसरला,

कालच म्हणजे रविवारी बौध्दवाडा शेरे येथील विजय पंडित यांच्या पुण्यनोमोदनाचा/जलदान विधीचा कार्यक्रम होता. या करिता त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, सगेसोयरे, ग्रामस्थ, कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ, आदी तालुक्यातून आले होते. यावेळी साधारण पणे दुपारी ४:४५ च्या आसपास समृद्धी महामार्गाचा इतका भंयकर ब्लास्टिंग झाला की उपस्थित सगळ्यांची पळापळ उडाली, वयोवृद्ध व लहान मुले तर खूपच घाबरले होते. यावर आम्ही हे रोजच भोगतो आहे असे ग्रामपंचायत सदस्य सविता पंडित यांनी सांगितले. ताबडतोब सदस्य सविता पंडित, रमेश जाधव, श्री भालेराव हे समृद्धी महामार्गाच्या दिशेने धावले व तेथील अधिकां-याना चांगलेच धारेवर धरले. यावर आम्ही काय करणार, वरुन आमच्या वर दबाव येतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थ अजूनच संतापले. म्हणूनच प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष द्यायवा हवे, येथील ग्रामस्थांना सुरक्षिततेची हमी देऊन त्यांना योग्य मोबदला द्यायला हवा अन्यथा येथे कधीही कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घ्यायला हवे.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...